Chhagan Bhujbal : 'इतके' आमदार निवडून आणा मगच अजित पवार मुख्यमंत्री होतील; भुजबळांनी थेटच सांगितलं

Chhagan Bhujbal : 'इतके' आमदार निवडून आणा मगच अजित पवार मुख्यमंत्री होतील; भुजबळांनी थेटच सांगितलं
Updated on

नाशिकः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमामध्ये बोलतना छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना एक सल्ला दिला असून अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी ४५चा आकडा ९० पर्यंत वाढवावा लागेल, असं ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर अजित पवारांसह ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. अजित पवार मुख्यमंत्री होतील असं वाटलं होतं. परंतु सध्यातरी तशी कोणतीही शक्यता नसल्याचं दिसून येत आहे. तरीही दर दोन-तीन आठवड्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा होतच असते.

Chhagan Bhujbal : 'इतके' आमदार निवडून आणा मगच अजित पवार मुख्यमंत्री होतील; भुजबळांनी थेटच सांगितलं
Ajit Pawar Vs Sharad Pawar: अजित पवारांच्या बॅनरवर शरद पवारांऐवजी यशवंतराव चव्हाणांचा फोटो

शनिवारी नाशिकच्या कळवण येथे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी कुणाची याबाबत लढा सुरु असला तरी पक्ष अजित पवारांसोबतच आहे. त्यामुळे न्यायाचा तराजू त्यांच्याच बाजूने झुकणार आहे.

Chhagan Bhujbal : 'इतके' आमदार निवडून आणा मगच अजित पवार मुख्यमंत्री होतील; भुजबळांनी थेटच सांगितलं
Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोणता पक्ष ठरणार वरचढ? वाचा सर्व्हे काय सांगतो

आज राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४५ आमदारांचं संख्याबळ आहे. ते वाढवून आपल्याला ८० ते ९० आमदार वाढवावे लागतील. त्यानंतरच अजितदादा मुख्यमंत्री होतील. त्यामुळे जिथे-जिथे निवडणुका होतील तिथे-तिथे अजितदादांचे लोक निवडून आले पाहिजेत. त्याची जबाबदारी आता तुम्हाला-मला उचलायला पाहिजे, असं भुजबळ म्हणाले.

मराठा आरक्षणावरुन सुरु असलेल्या वादावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, त्याला कुणाचाही विरोध नाहीये. केवळ इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये. अशीच सर्वांची भूमिका आहे. तरीही मला टार्गेट केलं जात आहे. एकमेकांची डोकी भडकवण्याचं काम कुणी करु नये, असं आवाहन भुजबळांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com