Chhagan Bhujbal warning : ‘‘ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार, जीआर आम्हाला दाखवलेला नाही’’ ; भुजबळांचा सूचक इशारा!

Chhagan Bhujbal Warns Over Maratha Reservation GR : ''काय खरं काय खोटं हे शोधणं गरजेचं'', असंही मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे.
OBC leaders led by Chhagan Bhujbal warn of protests and court action against the Maharashtra government’s GR on Maratha reservation.

OBC leaders led by Chhagan Bhujbal warn of protests and court action against the Maharashtra government’s GR on Maratha reservation.

Sakal
Updated on

Maratha Reservation GR Sparks OBC Protest Plans: मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात छगन भुजबळ यांनी कोर्टात जाणार असल्याचा आणि ओबीसी समाज रसत्यावर उतरणार असल्याचा आज इशारा दिला आहे.  जीआरमधील शब्दरचना ओबीसींसाठी अडचणीची ठरणार आहे, काय खरं काय खोटं हे शोधणं गरजेचं आहे आणि आज जरी सगळ्यांना छान वाटत असलं तरी पुढे अडचण होणार आहे, असं मंत्री छगन भुजबळांनी माध्यमांसमोर बोलून दाखवलं आहे.

माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट करताना मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, ‘’या जीआर विरोधात ओबीसी समाजातील प्रत्येकजण आपल्या परीने काम करतोय आणि मी देखील आपल्या पद्धतीने जे काही काम करायचं आहे, ते मी करणार आहे. समता परिषद, आम्ही ज्या पद्धतीने जायचं आहे, त्या पद्धतीने पुढे जातो आहोत.’’

तसंच ‘’माझं म्हणणं केवळ एवढंच आहे की, हा जो जीआर आहे त्यातील शब्दरचना ही पुढे ओबीसींसाठी अडचणीची ठरणार आहे. आज जरी कुणी सांगितलं जात असेल की, कुणालाच त्रास नाही, मराठ्याचे सगळे प्रश्न सुटेल तर कोणी म्हणतं तीन कोटी लोक आता ताबडतोब ओबसी झाले हे जर खरं असेल तर हे खोटं आहे आणि हे खरं असेल तर ते खोटं आहे. खरं खोटं नक्की काय हे शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’ असंही भुजबळांनी सांगितलं.

OBC leaders led by Chhagan Bhujbal warn of protests and court action against the Maharashtra government’s GR on Maratha reservation.
Laxman Hake: ओबीसींच्या बैठकीला लक्ष्मण हाके का गेले नाहीत? बंजारा आरक्षणाबद्दल भूमिका काय?, दिलं स्पष्टीकरण

याशिवाय, ‘’ओबीसीमध्ये ३७४ जाती आहेत. मराठा जात एकच आहे आमच्याकडे ३७४ जाती आहेत. परंतु सगळ्याचा उद्देश हाच आहे की, ओबीसींचं आरक्षण कमी होता कामा नये. जर आंदोलनानेच सगळं होत असेल तर ओबीसी समाजही आंदोलनासाठी उतरेल.’’ असा इशाराही यावेळी भुजबळांनी दिला.

OBC leaders led by Chhagan Bhujbal warn of protests and court action against the Maharashtra government’s GR on Maratha reservation.
Manoj Jarange : मराठ्यांना १७ सप्टेंबरपर्यंत कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करा, अन्यथा... मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

याचबरोबर ‘’ओबीसी समाजातील ३७४ जातीमधील प्रत्येकाची मागणी आहे की, ओबीसीला दाबलं जावू नये. दुसरे जे कोणते मोठे घटक आहेत, ज्यांना उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने, ओबीसी आयोगाने नाकारलं आहे त्यांना ओबीसीत जागा दिली नाही पाहीजे. या विचारावर सर्वांचं एकमत आहे, आता विविध प्रकारे प्रत्येकजण काम करत आहे. आमची लोकं कोर्टातही नक्कीच जातील.’’ अशा शब्दांत भुजबळांनी भूमिका स्पष्ट करत, सूचक इशाराही दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com