Raigad Fort : रायगडावरील शिवसमाधीजवळ पिंडदानाचा कार्यक्रम? घटनेचा Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raigad

Raigad Fort : रायगडावरील शिवसमाधीजवळ पिंडदानाचा कार्यक्रम? घटनेचा Video Viral

महाड : रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर अनेकदा श्राद्ध झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून महाराजांच्या समाधीसमोर पिंडदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा दावा या व्हिडिओत करण्यात आला आहे.

(Raigad Fort Crime News Updates)

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका शिवभक्ताने हे श्राद्ध रोखलं असल्याचं दिसत आहे. १० ते १२ व्यक्ती रायगडावरील शिवसमाधीजवळ एका कोपऱ्यात हे श्राद्ध करत असल्याचं दिसत असून शिवभक्तांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेवर पोलिसांची प्रतिक्रिया अजून आली नसून पोलिसांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष असेल.

येथे पाहा व्हिडिओ

काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ पुस्तक पूजेची घटना घडली होती. त्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. ते दोघेजण राख घेऊन समाधीजवळ पुस्तकाची पूजा करत असताना निदर्शनास आले होते. त्यानंतर शिवभक्तांकडून पोलिसांनी ही माहिती देण्यात आल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली होती.

टॅग्स :Maharashtra NewsRaigad