esakal | मेळघाटनं करून दाखविलं, चिचघाट बनलं महाराष्ट्रातील संपूर्ण लसीकरण करणारं पहिलं गावं
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

मेळघाटनं करून दाखविलं, चिचघाट बनलं महाराष्ट्रातील संपूर्ण लसीकरण करणारं पहिलं गावं

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

अमरावती : मेळघाटमध्ये एक वेळ अशी होती की नागरिक गैरसमुजतीमुळे कोरोना लसीकरण करायला तयार नव्हते. मात्र, आता मेळघाताली एक गावाने ४५ वर्षांपेक्षा वरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणारे गाव म्हणून महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकाविला आहे. गेल्या ६ मे रोजी चिखलदऱ्याच्या दुर्गम भागात वसलेले चिचघाट गावाने संबंधित वयोगटातील ११० नागरिकांना लसीकरण केले. तीन वर्षांपूर्वी देखील मेळघाटातील हरिसाल हे गाव महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव बनले होते.

हेही वाचा: कोरोना चाचणी टाळून प्रवाशांची पळवापळवी, नागपूर स्टेशनवरील प्रकार

चिचघाट पाठोपाठ बाहदरापूर आणि रुईफाटा या दोन गावांनी देखील लसीकरण पूर्ण केले आहे. या गावांमध्ये ४५ वर्षांवरील १४८ नागरिकांपैकी ८८ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. या परिसरात सुरुवात लशींचे डोस वाया जात होते. मात्र, आता आपल्या गावात लसीकरण शिबिर व्हावे यासाठी ग्रामस्थ स्वतः उत्सुकतेनं पुढाकार घेताना दिसतात. त्यामुळे देशात सर्वत्र लशींचा तुटवडा भासतोय तसाच तुटवडा मेळघाटमध्ये देखील आहे. या भागात कमी लोकसंख्या असली तरी दूरदूरपर्यंत लहान-लहान पाडे, वस्ती आहेत. तसेच या भागात कोरकू आदिवासी देखील राहतात. या भागात लसीकरणाला सुरुवात झाली त्यावेळी आदिवासी बांधव लस घ्यायला तयार नव्हते. त्यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. तुमच्या गैरसमजांमुळे बाहेरच्या लोकांना तुमच्या हिस्स्याची लस मिळत आहे. ते लोक तुमची लसी पळवून नेत आहेत, अशाप्रकारे त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. तसेच कोरकू आदिवासी लसीकरणाचे फायदे सांगणारा व्हिडिओ तयार करण्यात आला आणि तो लोकांना दाखविण्यात आला. शेवटी लोक स्वतः लसीकरणासाठी येऊ लागले. तसेच आता ग्रामस्थ स्वतः लसीकरण शिबिरासाठी फोन करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

loading image