मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळेना! सोलापूर जिल्ह्यातील ‘शासन आपल्या दारी’ पुन्हा लांबणीवर; १२ महिन्यांपासून लाभार्थी ‘वेट ॲण्ड वॉच’वर

‘शासन आपल्या दारी’चा सोलापूर जिल्ह्यातील कार्यक्रम आता दुसऱ्यांदा पुढे ढकलला आहे. फेब्रुवारी २०२३मध्ये पंढरपुरात हा कार्यक्रम नियोजित होता, पण तो झाला नाही. आता लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी कार्यक्रम घेण्याची घाई सरकार पातळीवरून सुरू आहे. पण, पुन्हा तारीख पुढे गेली आहे.
Ajit pawar, Devendra Fadanvis, Eknath Shinde
Ajit pawar, Devendra Fadanvis, Eknath Shindeesakal

सोलापूर : ‘शासन आपल्या दारी’चा सोलापूर जिल्ह्यातील कार्यक्रम आता दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आला आहे. फेब्रुवारी २०२३मध्ये पंढरपुरात हा कार्यक्रम नियोजित होता, पण त्यावेळी तो झाला नाही. आता लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी हा कार्यक्रम घेण्याची घाई सरकार पातळीवरून सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यादृष्टीने सर्वच विभागांना पंढरपूरला येणाऱ्या लाभार्थींची यादी निश्चित करण्याचे आदेश दिले. पण, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या तारखा उपलब्ध नसल्याने हा कार्यक्रम पुन्हा लांबणीवर पडला असून लाभार्थींना आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.

संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांसाठी पात्र ३५ हजार लाभार्थींना एकत्रित करून बसगाड्यातून त्यांना पंढरपुरात नेले जाणार आहे. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी जाणाऱ्या लाभार्थींना त्याठिकाणी चहा, नाष्टा, जेवणाची सोय केली जाणार असून त्यांना त्याठिकाणी नेण्यासाठी व पुन्हा घरी आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या ४५० बसगाड्यांची सोय केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे हा कार्यक्रम घेण्याचे नियोजन मागील वर्षभरापासून सुरू आहे. पण, या कार्यक्रमाला मुहूर्त अद्याप लागलेला नाही. फेब्रुवारी २०२३ मध्ये हा कार्यक्रम होणार होता, त्यामुळे खर्चाची संपूर्ण तयारी जिल्हा प्रशासनाने केली होती. पण, काही कारणास्तव हा कार्यक्रम होवू शकला नाही.

आता लोकसभेची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल म्हणून २७ ते २९ फेब्रुवारी दरम्यान हा कार्यक्रम नियोजित होता. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कार्यक्रमाच्या तयारीसाठी सर्वच विभागप्रमुखांची बैठक देखील घेतली. पण, आता हा कार्यक्रम पुन्हा लांबणीवर पडला असून तो कधी होईल हे निश्चित नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

एसटी बसगाड्यांसाठी सव्वाकोटींचे भाडे

पंढरपूर येथील नियोजित ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी जिल्हाभरातून अंदाजे ३५ हजार लाभार्थी त्याठिकाणी नेले जाणार आहेत. त्यासाठी साधारणत: ४५० बसगाड्यांची गरज भासणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरवातीला २७ ते २९ फेब्रुवारी या काळात कधीही बसगाड्या लागतील, असे कळविले होते. त्यानंतर एसटीच्या विभाग नियंत्रकांना ३ मार्च तारीख सांगण्यात आली. आता ७ मार्चपर्यंत कार्यक्रम होवू शकतो, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या कार्यक्रमासाठी एसटी महामंडळाला बसगाड्यांच्या भाड्यापोटी अंदाजे सव्वाकोटी रुपयांचे भाडे (एका गाडीसाठी २५ हजार रुपये) द्यावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com