मुख्यमंत्र्याचा अण्णा हजारेंना व्हिडीओ कॉल, म्हणाले...

chief minister eknath shinde ask blessings said keep ordering to anna hazare over video call
chief minister eknath shinde ask blessings said keep ordering to anna hazare over video call

मुंबई : राज्याच्या राजकारणातील मोठ्या घडामोडीनंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. यानंतर राज्यातील ११ दिवसानंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार महाराष्ट्रात परत येणार आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे सरकारने धडाक्यात कामकाजाला सुरूवात केली आहे, यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांचा समाजसेवक आण्णा हजारेंशी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. (chief minister eknath shinde ask blessings said keep ordering to anna hazare over video call)

गोव्याहून मुंबईला येण्यापूर्वी हॉटेलमध्ये असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्हिडीओ कॉल करत आण्णा हजारेंशी संवाद साधला यावेळी त्यांनी आण्णा हजारेंना आशिर्वाद मागीतले. यावेळी जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व्हिडिओ कॉलवरून अभिनंदन केले आहे.

chief minister eknath shinde ask blessings said keep ordering to anna hazare over video call
...तर राजकारण करायला माणूसच शिल्लक राहणार नाही - अमित ठाकरे

अण्णा हजारे म्हणाले, तुम्ही आतापर्यंत केलेल्या कामाची मुख्यमंत्रीपद ही पावती आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नमस्कार, एकनाथ शिंदे बोलतोय, असे म्हणल्यानंतर अण्णा हजारेंनी देखील त्यांचं मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याने आभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावर एकनाथ शिंदे यांनी धन्यवाद , खूप आभारी आहे, तुमचा आशीर्वाद असू द्यात. शुभेच्छा असू द्या. यासोबत तुमचे मार्गदर्शन असू द्यात. जेव्हा-जेव्हा काही लागेल तुम्हाला तेव्हा आदेश करत जा, सूचना करत जा. राज्याच्या हितासाठी आणि जनतेला अपेक्षित काम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, देवेंद्रजी आणि मी आमचे सहकारी.. तुम्हाला जेव्हा काही वाटेल तेव्हा आम्हाला आदेश देत जा... असे एकनाथ शिंदे अण्णा हजारेंना म्हणाले.

chief minister eknath shinde ask blessings said keep ordering to anna hazare over video call
मुख्यमंत्रीपद मिळालं मात्र, एकनाथ शिंदेंसमोर आहेत ही 5 आव्हानं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com