
मुख्यमंत्री पदापेक्षा एकनाथ शिंदेंच्या नातूप्रेमाचीच चर्चा; शपथ घेताच...
गेले २४ तास राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजवणारे होते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणं, त्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुंबईत येणं आणि त्यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठका करत अखेर मुख्यमंत्रिपदी विराजमान होणं, असा सगळा या २४ तासांचा सारांश सांगता येईल. दरम्यान, या मोठ्या सत्ताबदलात एकनाथ शिंदेंच्या नातूप्रेमाची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे. (CM Eknath Shinde Family)
हेही वाचा: 'पांडुरंगाच्या महापुजेला एकनाथ शिंदे' सोशल मीडियावर रंगली चर्चा
एकनाथ शिंदेंनी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी राजभवनात त्यांची पत्नी, सून आणि नातू रुद्रांशही आला होता. शपथविधीपूर्वी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आपल्या परिवाराला भेटले. परिवार समोर आल्याआल्या त्यांनी सर्वात आधी आपल्या नातवाला प्रेमाने उचलून कडेवर घेतलं आणि त्याचे लाड पुरवू लागले. तसंच शपथविधी संपल्यावर मंचावरुन खाली उतरताच त्यांनी पहिल्यांदा नातवाकडेच धाव घेतली.
हेही वाचा: बाळासाहेब, आनंद दिघेंचं स्मरण करुन एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान
त्यांच्या नातूप्रेमाबद्दल त्यांच्या परिवाराने याआधीही भाष्य केलं आहे. त्यांची सून वृषाली आणि मुलगा तसंच खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी एका कार्यक्रमात एक गोड खंत व्यक्त केली होती. बाबा आजकाल आमच्याकडे लक्षच देत नाहीत, त्यांचा पूर्ण वेळ हा रुद्रांशसोबत जातो, सगळं लक्ष त्याच्याकडेच असतं. तोच त्यांचा सगळ्यात लाडका आहे, अशी गोड तक्रार या दोघांनी केली होती.
हेही वाचा: Maharashtra Politics LIVE: महाराष्ट्रात आता 'शिंदे सरकार'!!!
दरम्यान, एकनाथ शिंदे शपथविधीवेळी आपल्या नातवाचे लाड करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. त्यांच्या कुटुंबवत्सलपणाचं कौतुकही केलं जात आहे.
Web Title: Chief Minister Eknath Shinde Family Oath Taking Ceremony
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..