‘मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळे’त पंढरपुरातील चिंचणी जि.प. शाळेचा तिसरा क्रमांक; खासगीतून श्री बसवेश्वर हायस्कूलचा दुसरा क्रमांक

‘मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा’ अभियानात सोलापूरसह राज्यभरातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका व खासगी अशा एक लाखांहून अधिक शाळांनी सहभाग नोंदवला होता. सोलापूर जिल्हा परिषदेच्या चिंचणी (ता. पंढरपूर) येथील शाळेने पुणे विभागात तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर खासगी शाळांमधून निंबर्गी येथील श्री बसवेश्वर हायस्कूल विभागात दुसरा क्रमांक पटकावला.
majhi shala sundar shala initiative
majhi shala sundar shala initiative esakal

सोलापूर : ‘मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा’ अभियानात सोलापूरसह राज्यभरातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका व खासगी अशा एक लाखांहून अधिक शाळांनी सहभाग नोंदवला होता. सोलापूर जिल्हा परिषदेच्या चिंचणी (ता. पंढरपूर) येथील शाळेने पुणे विभागात तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर खासगी शाळांमधून निंबर्गी येथील श्री बसवेश्वर हायस्कूल विभागात दुसरा क्रमांक पटकावला. मंगळवारी (ता. ५) मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या शाळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

शाळांमधील भौतिक सोयी-सुविधा, गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम, विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता, स्वच्छता अशा विविध बाबींच्या आधारावर राज्यातील सर्वोत्कृष्ट ६६ शाळांची निवड या अभियानातून करण्यात आली आहे. पंढरपूर तालुक्यातील पर्यावरणपूरक चिंचणी गावाची ओळख राज्यभर आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी देखील जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच या गावात पहिल्यांदाच सर्वसाधारण सभा घेतली होती. तत्पूर्वी, त्यांनी चिंचणीतील जिल्हा परिषदेच्या शाळेला देखील भेट दिली होती. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील मुलांप्रमाणेच तेथील विद्यार्थी इंग्रजी, अंकगणितात अव्वल असल्याचे दिसून आले होते.

या शाळेला आता ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाअंतर्गत पुणे विभागात तिसरा क्रमांक मिळाला आहे. खासगी शाळांमधून दक्षिण सोलापुरातील निंबर्गी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाने विभागात दुसरा क्रमांक पटकावला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत या शाळांचा गौरव होणार आहे.

शासकीय शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७८८ शाळा असून महापालिकेच्याही जवळपास ५८ शाळा आहेत. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात जिल्ह्यातील बहुतेक शाळांचा सहभाग होता. पण, राज्यस्तरावर जिल्ह्यातील एकही शाळा निवडली गेली नाही. विभागीय स्तरावर सोलापूर जिल्हा परिषदेच्या एकाच शाळेची निवड झाली आहे. महापालिकेची एकही शाळा ना राज्य ना विभागीय स्तरावर पोचली. या अभियानामुळे शासकीय व खासगी अनुदानित शाळांच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. राज्यभरात अशीच स्थिती असल्याचे समोर आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com