esakal | चिपी विमानतळाचं उद्घाटनं मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते; राऊतांचं राणेंना आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

चिपी विमानतळाचं उद्घाटनं मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते; राऊतांचं राणेंना आव्हान

लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे खास करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षांत चिपी विमानतळासंदर्भात चार वेळा बैठका घेतल्या.

चिपी विमानतळाचं उद्घाटनं मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते; राऊतांचं राणेंना आव्हान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुडाळ : चिपी अर्थात सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्‍घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (CM Uddhav Thackeray) केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या हस्ते ९ ऑक्टोबरला नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे संसदीय गटनेते, खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी दिली. केंद्रीय लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग विमानतळाच्या उद्‍घाटनाचे धाडस करू नये, असा इशाराही त्यांना दिला. यामुळे विमानतळ (Chipi Airport) उद्‍घाटन वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

बहुचर्चित चिपी विमानतळावर ७ ऑक्टोबरपासून विमान वाहतूक सुरू करू, असे पत्र अलायन्स एअर कंपनीने विमान वाहतूक मंत्रालयाला दिले होते. त्याबाबतची माहिती खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना देऊन ७ ऑक्टोबरला विमान सुरू करण्याच्या दृष्टीने योग्य ती तयारी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी केली होती.

हेही वाचा: अभिनेता रजत बेदीनं धडक दिलेल्या पादचाऱ्याचा मृत्यू

केंद्रीय मंत्री राणे (Narayan Rane) यांनीही दिल्लीत मंगळवारी (ता. ७) चिपी विमानतळाचे उद्‍घाटन ९ ऑक्टोबरला केले जाईल, असे जाहीर केले होते. त्यामुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्‍वभूमीवर आज राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याच दिवशी उद्‍घाटन असल्याचे जाहीर केले. कुडाळ एमआयडीसी येथे त्यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री शिंदे यांच्याशी चर्चेनंतर ९ ऑक्टोबर ही उद्‍घाटनाची तारीख निश्‍चित झाल्याचे जाहीर केले. आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, गटनेते नागेंद्र परब, अमरसेन सावंत, राजन नाईक, अतुल बंगे, सचिन काळप, मंदार शिरसाट, बबन बोभाटे, विकास कुडाळकर आदी उपस्थित होते.

खासदार राऊत म्हणाले, 'चिपी विमानतळावरून विमानाचे उड्डाण कधी होते याची सर्वांनाच प्रतीक्षा होती; पण आम्हा सर्व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे खास करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षांत चिपी विमानतळासंदर्भात चार वेळा बैठका घेतल्या. मंत्री गजपती राजू, कॅटन पुरी, सुरेश प्रभू आणि मंत्री ज्योतिरादित्य शिंदे तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई आदींसोबत संपर्क साधला. मी स्वतः गेली सात वर्षे या सर्व मंत्र्यांसह एव्हिएशन कन्सल्टेटिव्ह कमिटीमध्ये हा मुद्दा सातत्याने लावून धरला होता. अखेर या सर्व प्रयत्नांना यश आल्याने सिंधुदुर्ग एअरपोर्टवरून नियमित वाहतूक सुरू होण्याचे निश्‍चित झाले आहे. मंगळवारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केली आणि ९ ऑक्टोबर हा दिवस उद्‍घाटनाचा निश्‍चित केला आहे. त्या दिवशी दुपारी १२ वाजता मुंबईहून टेक ऑफ घेतलेले विमान सिंधुदुर्ग विमानतळावर दुपारी १ वाजून १० मिनिटांनी उतरेल आणि पुन्हा १ वाजून ३५ मिनिटांनी ते विमान मुंबईला जाण्यासाठी टेक ऑफ घेईल. १ तास १० मिनिटांचा हा प्रवास एअर अलायन्स या कंपनीच्या विमानातून होणार आहे. ७२ पॅसेंजरची क्षमता असलेले हे विमान ६ सप्टेंबरलाच मुंबईत आलेले आहे.'

हेही वाचा: "डिस्को, पब ही आरोग्य केंद्र आहेत का?"; ठाकरेंना भाजपचा सवाल

loading image
go to top