
'दादा, हाच नियम शिवसैनिक अन्...', चित्रा वाघ यांचा अजित पवारांना सवाल
मुंबई : राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भोंग्यांबाबत कार्यकर्त्यांना आदेश दिला होता. त्यावरून अजित पवारांनी (Ajit Pawar) राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यावरच आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रतिक्रिया दिली असून हाच आदेश शिवसेना आणि त्यांच्या पक्षप्रमुखांनाही लागू होतो, असं म्हटलं आहे.
हेही वाचा: 'साधी विकास सोसायटी काढली नाही…'; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांबाबत टोकाची भूमिका घेतली आहे. तुम्ही मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीतर आम्ही दुप्पट आवाजात भोंग्यांवरून हनुमान चालिसा वाजवू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना तसे आदेश देखील दिले. पण, यावरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावरून अजित पवारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर गुन्हे कार्यकर्त्यांवर दाखल होतील. यांना घरात बसून बोलायला काय जाते? असं अजित पवार म्हणाले होते. त्यावरूनच आता चित्रा वाघ यांनी अजित पवारांना सवाल विचारला आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ? -
गुन्हे कार्यकर्त्यांवर दाखल होतील हाच नियम राणा दाम्पत्याच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या शिवसैनिक आणि त्यांच्या पक्षप्रमुखांनाही लागू होतो ना दादा? असा सवाल चित्रा वाघ यांनी अजित पवारांना विचारला आहे.
दरम्यान,उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर हनुमान चालिसा वाचण्यासाठी राणा दाम्पत्य मुंबईमध्ये दाखल झालं होतं. त्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्या खार येथील घराबाहेर ठिय्या देऊन राणा दाम्पत्यांना त्यांच्या घरातच रोखलं. यावेळी शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी आंदोलन केलं. शिवसैनिकांचा मातोश्रीबाहेर देखील ठिय्या होता. त्यानंतर राणा दाम्पत्यांना अटक करण्यात आली होती.
Web Title: Chitra Wagh Asked Ajit Pawar To Take Action Against Shivsena Party Worker In Rana Couple Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..