'एसटी'च्या मोक्याच्या जागा हडपण्याचा डाव; चित्रा वाघ यांचा आघाडी सरकारवर निशाणा ;ST Workers Strike | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra Wagh

जोपर्यंत आम्हाला आमचा हक्क मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही: चित्रा वाघ

'एसटी'च्या मोक्याच्या जागा हडपण्याचा डाव; चित्रा वाघ

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

गेले पाच दिवस महाराष्ट्रामध्ये एसटी कर्मचाऱ्याचे आंदोलन सुरू आहे. त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले तर, परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab)यांनी मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार नो वर्क- नो पे (काम नाही तर वेतनही नाही) अशी भूमिका घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानात रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व आमदार सदाभाऊ खोत(Sadabhau Khot)यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे. यामध्ये राज्यभरातून भाजप नेत्यांनी सहभाग नोंदवला आहे. राज्यभरातून टीकेचे सूर उमटत असतानाच आज भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagha) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा: 'एसटी' आंदोलनाची नवी ठिणगी; वाटेगावात ST दाखल होताच झाली दगडफेक

महाराष्ट्रात 28 ते 30 जणांनी आत्महत्या केली तेव्हा उपमुख्यमंत्र्यांनी 500 कोटीची घोषणा केली होती. हे बळी घेणारे सरकार आहे. जोपर्यत आत्महत्या होत नाहीत, तोपर्यत यांना जाग येत नाही अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

पुढे त्या म्हणाल्या, जोपर्यंत आम्हाला आमचा हक्क मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. कालपर्यंत शिवसेनेने मराठी मराठी करत राजकारण केले आता त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. परिवहन मंत्री कुठे गायब झालेत माहित नाही. महिन्याचा पगार तुम्हाला करता येत नाही. हे गरिबांचे सरकार नाही यांच्या बगलबच्याचे सरकार आहे. सरकार एकाच गोष्टीवर खंबीर आहे ते म्हणजे आमचे सरकार खंबीर. गिरणी कामगारांना देखील यांनी देशोधडीला लावले. एसटीच्या सुद्धा मोक्याच्या जागा हडपण्याचा यांचा डाव आहे. असा निशाणा आघाडी सरकारवर साधना.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा संचित तोटा वाढलेला आहे. एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करता येईल का, यादृष्टीने समिती अभ्यास करत आहे. प्रवाशांना वेठीस धरून प्रश्‍न सुटणार नाही, तर चर्चेतून मार्ग काढता येईल. असे ही परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले.

loading image
go to top