
मुंबईच्या महापौर ताईंचं पेंग्वीन प्रेम जगजाहीर; चित्रा वाघ
मुंबई: मुंबईतील वरळीत एक महिन्यापूर्वी सिलिंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील चौघे होरपळले तर चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला यावेळी आठ मिनिटांचा प्रवास करण्याची आवश्यकता महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना वाटली नाही. मात्र ५५० किमी प्रवास करत पेंग्वीनच्या भेटीला जायला त्यांना वेळ मिळाला असा टोला भाजपच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी लगावला आहे. त्यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.
त्या म्हणाल्या, मुंबईच्या सन्माननीय महापौरताईंचं पेंग्वीन प्रेम आज जगजाहीर झाले. युवराजांना पेंग्वीन म्हणतात हेही त्यांनी स्वताचं जाहीरपणे कबूल केले आणि युवराज यासाठी त्यांचं अभिनंदनही करतीलच. त्यांनी जी गुजरातमध्ये मिळालेल्या आदरतिथ्याची तारीफ केली ती मुळात आपली हिंदू संस्कृती आहे.पण आपल्याला सध्या सुल्तानशाहीच जवळीक वाटत असल्यामुळे हिंदूच्या परंपरेविषयी आपण भारावून जाणे स्वाभाविक आहे.आज सर्व मुंबईकरांना हे तर कळून चुकले आहे की सत्ताधारी सेना ही फक्त पेंग्वीनसाठी आणि हायवे कन्स्ट्रक्शनच्या भल्यासाठी काम करते आणि मुंबईकरांच्या दैनंदिन समस्येवरती त्यांना काही देणे घेणे नाही. असही त्या म्हणाल्या.
चिवा आणि चंपा!
चिवा ताई मला पेंग्विनकर म्हणून मला बोलवतात. पण आम्ही सिद्ध केलंय की पेंग्विन मुंबईकर झाले आहेत. मला निष्पाप पेंग्विनंच नाव दिलेलं आवडलंय. कारण जे चांगलं देता येईल ते मुंबईकरांना आम्ही देऊ, असा टोला पेडणेकर यांनी लगावला आहे.
Web Title: Chitra Wagh Criticism On Kishori Pednekar Political News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..