'गिरे तो भी टांगे उपर..अशी काहीशी अवस्था झालीय', चित्रा वाघ यांचा राऊतांवर निशाणा | Chitra Wagh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chitra wagh-sanjay raut

'गिरे तो भी टांगे उपर..अशी काहीशी अवस्था झालीय' - चित्रा वाघ

महाराष्ट्रात भाजप (bjp) आणि शिवसेना (shivsena) यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या शब्दयुद्धात आता संजय राऊत यांनी दावा केला आहे की, बाबरी मशीद प्रकरणानंतर त्यांच्या पक्षाने उत्तर भारतात निवडणूक लढवली असती तर पंतप्रधानपदावर शिवसेनेचा नेता असता. त्यावर आता भाजपच्या चित्रा वाघ (bjp chitra wagh) यांनी ट्विट करत राऊतांवर (sanjay raut) निशाणा साधला आहे. काय म्हणाल्या वाघ?

शिवसेनेचा सहभाग होता म्हणूनच मुंबईत दंगली उसळल्या? - चित्रा वाघ

"बाबरी मशिद पतनात शिवसेना सहभागी होती.. शिवसेनेचा सहभाग होता म्हणूनच मुंबईत दंगली उसळल्या… असा संजय राऊतांनी कबूलीनामा दिलाय…. पुरोगामी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ऐकताय ना ?"

वाघ यांचं आणखी एक ट्विट

शिवसेना चौथ्या नंबरवर गेली हे महत्त्वाचं नाही तर सेनेनं जागा जिंकल्या हे महत्त्वाचं असल्याचं संजय जी राऊत म्हणताहेत... संजय राऊतांचं गणित लहानपणापासूनच कच्चं आहे की पराभवामुळे डोक्यावर परिणाम झालाय.. गिरे तो भी टांगे उपर... अशी काहीशी अवस्था झालीय यांची… !!

बाबरी पाडल्यानंतर देशात शिवसेनेची लाट - राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाजपसोबतच्या युतीवर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, बाबरी पाडल्यानंतर देशात शिवसेनेची लाट आली होती.

अयोध्येच्या राम मंदिर आंदोलनात शिवेसेनेची भूमिका काय हे सर्वांना माहिती आहे. रामलल्ला प्रकरणी शिवसेनेची भूमिका ऐतिहासिक अशीच आहे. ज्यावेळी राम मंदिराचा मुद्दा थंड पडला होता त्यावेळी शिवसेनेने तो मुद्दा उचलला. अनेक शिवसैनिकांनी केसेस अंगावर घेतल्या. त्यामुळे आयोध्येशी शिवसेनेचा काय संबंध आहे हे रामाला माहिती आहे असा टोला शिवसेनेचे खासदास संजय राऊत यांनी भाजपला काल लगावला.

हेही वाचा: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतले सोनिया, प्रियांका स्टार प्रचारक

हेही वाचा: National Voter Day Motto: मतदारराजा निवडणुकीत सहभागी हो...!

Web Title: Chitra Wagh Criticized On Shivsena Leader Sanjay Raut Over His Statement On Babri Masjid

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..