केतकीला शिवीगाळ करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा, चित्रा वाघांची मागणी

Chitra Wagh on Ketaki Chitale
Chitra Wagh on Ketaki Chitalesakal
Updated on

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट (Ketaki Chitale Sharad Pawar Controversy) केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला अटक (Ketaki Chitale Arrested) करण्यात आली. न्यायालयाने आज तिला पोलिस कोठडी देखील सुनावली आहे. यानंतर चितळेवर अश्लील भाषेत टीका करणाऱ्यांवर कारवाई करणार का? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी केला आहे.

Chitra Wagh on Ketaki Chitale
केतकीला पवारांवरील टीका भोवली! न्यायालयानं सुनावली कोठडी

केतकी चितळेवर कारवाई झाली. आता त्याचबरोबर केतकी चितळेला अतिशय अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ, उघड उघड चोपायची/जीवे मारण्याची भाषा करणाऱ्या मर्दांवर आणि रणरागिणींवर देखील रितसर गुन्हे दाखल करून तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. कायदा सर्वांना समान असतो, असं म्हणतात. मग यांच्यावर कारवाई करणार का? असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी या ट्विटमध्ये सोशल मीडियावरील टीकेचे स्क्रॉनशॉट्स देखील जोडले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण? -

केतकी चितळेने भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट आपल्या सोशल मीडियावरून शेअर केली. त्यामधून शरद पवारांवर अतिशय खालच्या पातळीवर टीका करण्यात आली होती. त्यामुळे राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी जवळपास १० पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. ठाणे पोलिसांनी शनिवारी केतकीला अटक केली होती. यावेळी देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तिच्यावर अंडी आणि शाईफेक केली होती. तसेच तिला आमच्या ताब्यात द्या आम्ही तिला धडा शिकवतो, अशा धमक्या देखील दिल्या होत्या. इतकंच नाहीतर सोशल मीडियावरून देखील केतकीवर टीका करण्यात आली. पोलिसांनी आज केतकीला न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने तिला १८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com