किशोरी पेडणेकरांना अश्लील भाषेत धमकी; बंद लिफाफ्यातून पत्र

या पत्रात अश्लील शिवीगाळासह पेडणेकर यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
Kishori Pednekar Received Threat Letter
Kishori Pednekar Received Threat Letter
Summary

या पत्रात अश्लील शिवीगाळासह पेडणेकर यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

शिवसेना नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना धमकीचे पत्र आले आहे. या पत्रात अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यासह जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हे पत्र विजेंद्र म्हात्रे या नावाच्या व्यक्तीने बंद लिफाफ्यातून पाठवले आहे. या पत्रात त्यांनी पेडणकर यांना जीवेमारण्याची धमकी दिली आहे. घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ पसरली आहे. (Kishori Pednekar Received Threat Letter)

Kishori Pednekar Received Threat Letter
आता पवारच तारणहार... शिवसेनेसह राष्ट्रवादीचे नेते 'सिल्व्हर ओक'वर

पत्र लिहणाऱ्याने सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत अश्लील भाषा वापरली आहे. यात त्याने किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केली आहे. (maharashtra politics) पत्र लिहणाऱ्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पेडणेकर यांचा उल्लेख आहे. या पत्रामुळे सध्या राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आलं आहे. (Kishori Pednekar News)

Kishori Pednekar Received Threat Letter
Maharashtra Politics : सत्तास्थापनेचा वेग राफेलपेक्षा जास्त - राऊत

दरम्यान, सध्याचे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. दररोज घडणाऱ्या घडामोडींमुळे चर्चांना ऊत आला आहे. सुरुवातीपासून यापासून अनभिज्ञ आहोत असे सांगणाऱ्या भाजपने आता एंट्री केल्याने हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेत मोठी फूट पडली असून पर्यायाने सरकार पडणार, हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस पुन्हा सिंहासन संपादन करणार असल्याचं चित्र आहे. याचदरम्यान आता पेडणेकर यांना आलेल्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com