Chitra Wagh on Nawab Malik| "किमान सरकारी हँडलवरून तरी..."; नवाब मलिकांच्या फोटोमुळे चित्रा वाघ संतापल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chitra wagh
"किमान सरकारी हँडलवरून तरी..."; नवाब मलिकांच्या फोटोमुळे चित्रा वाघ संतापल्या

"सरकारी हँडलवरून तरी..."; नवाब मलिकांच्या फोटोमुळे चित्रा वाघ संतापल्या

महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. त्यानंतर मलिकांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत होती. विरोधकांनी हा विषय सातत्याने लावून धरला होता. त्यानंतर अखेर मलिक यांच्याकडे असणाऱ्या खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांना वाटून दिली असून मलिकांचं मंत्रिपद कायम ठेवण्यात आलं आहे. अशातच सरकारच्या एका पोस्टवरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.

महाराष्ट्र सरकारने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक पोस्टर शेअर केलं आहे. ज्यामध्ये मंत्रिमंडळ निर्णयाविषयीची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये नवाब मलिक यांचा फोटो लावण्यात आला आहे आणि या फोटोखाली अल्पसंख्याक मंत्री असं लिहिण्यात आलं आहे. यावर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आहे. आपल्या ट्विटमध्ये टॅग करत चित्रा वाघ यांनी आपला आक्षेप नोंदवला आहे.

आपल्या ट्विटमध्ये चित्रा वाघ म्हणतात, किमान सरकारी हॅण्डलवरून तरी चुकीचे ट्विट नको. नवाब मलिक हे मंत्रिमंडळात आहेत पण बिनखात्याचे मंत्री अल्पसंख्यक खात्याचा कारभार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे दिला आहे तर त्यांचा फोटो घ्या आणि नवाब मलिक यांचाच फोटो घ्यायचा असेल तर खाली बिनखात्याचे मंत्री असे तरी लिहा.

२३ फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. मात्र त्यांचा राजीनामा न घेता त्यांच्याकडच्या खात्यांचा पदभार इतर मंत्र्यांकडे सोपवण्यात आला आहे.

Web Title: Chitra Wagh Tweet About Nawab Malik Photo On Government Poster

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top