

मुंबई - राज्यातील बदलत्या हवामानाचा थेट परिणाम आता सार्वजनिक आरोग्यावर दिसू लागला आहे. अवकाळी पाऊस, पूर, दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर डेंगी व मलेरियासारख्या डासजन्य आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. वाढते तापमान, आर्द्रता आणि अनियमित पावसामुळे डासांची उत्पत्ती झपाट्याने वाढत असल्याचे आरोग्यतज्ज्ञांचे निरीक्षण आहे.