cm devendra fadnavis
sakal
नागपूर - ‘राज्यातील प्रत्येक प्रश्नाची सांगड ‘लाडकी बहीण’ योजनेशी घालण्याच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. केवळ विरोधी पक्षावरच नव्हे, तर सत्ताधारी बाकांवरील आमदारांनाही त्यांनी ‘या योजनेच्या विरोधात जाल, तर घरी बसाल,’ असा परखड इशारा देत या विषयावरील चर्चेला पूर्णविराम दिला.