मी कुणालाच घाबरलो नाही, म्हणूनच मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो; एकनाथ शिंदेंचं विधान

CM eknath shinde
CM eknath shinde Esakal

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळीचं औचित्य साधून नक्षलग्रस्त गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी सीमेची पाहणी केली. एकनाथ शिंदे यांनी नक्षलग्रस्त भागाची सीमेवर जावून पाहणी करणारे पहिले मुख्यमंत्री ठरले आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरला आहे. ( Eknath Shinde news in Marathi)

CM eknath shinde
पतीला उद्देशून 'ते' शब्द उच्चारणे क्रूरता म्हणत, पुण्यातील महिलेची याचिका HCने फेटाळली

एकनाथ शिंदे म्हणाले की, जवान सध्या कर्तव्यावर आहेत. आपले जवान ज्या पद्धतीने काम करतात, त्यांच्यासाठी आम्ही दिवाळी साजरी कऱण्यासाठी आलो आहोत.

गडचिरोलीला आल्याबद्दल शिंदे म्हणाले की, मी कधीच कशाला घाबरत नाही. भीती असती तर आलोच नसतो. कुठल्याही परिस्थितीला तोंड देत आलोय, त्यामुळेच मी मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो आहे. आपले जवान कोणत्या परिस्थितीत काम करतात हे पाहण्यासाठी मी आल्याचं शिंदे यांनी म्हटलं.

CM eknath shinde
Congress : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींचा पराभव करु; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

दरम्यान राज्य सरकार आणि गृहविभाग अतिशय चोखपणे काम करत आहेत. नक्षल्यांचा वावर या भागात आहे. जवानांनी कर्तबारी दाखवली म्हणून नक्षली चळवळ कमजोर झाल्याचंही शिंदे यांनी नमूद केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com