Ashadhi Ekadashi | मुख्यमंत्री होऊनही शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची पूजा नाहीच? नियम आले आडवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde Pandharpur
मुख्यमंत्री होऊनही शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची पूजा नाहीच? नियम आले आडवे

मुख्यमंत्री होऊनही शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची पूजा नाहीच? नियम आले आडवे

राज्यात सत्तानाट्य सुरू असताना यंदा आषाढी एकादशीदिवशी विठ्ठलाची शासकीय महापूजा कोण करणार? या प्रश्नाची चर्चा होतीच. दहा दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत. मात्र मुख्यमंत्री होऊनही एकनाथ शिंदे शासकीय महापूजेला मुकणार का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. (Ashadhi Ekadashi CM Eknath Shinde News)

हेही वाचा: Ashadhi Ekadashi 2022 Date: यंदाची आषाढी एकादशी कधी साजरी होणार, जाणून घ्या व्रत महत्व आणि माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. हा दौरा संपवून ते आजच शासकीय महापूजेसाठी पंढरपूरात जाणार आहेत. एकादशीदिवशी (Ashadhi Ekadashi) पहाटे ते शासकीय महापूजा करतील. मात्र या सगळ्या दरम्यान राज्यातल्या नगरपालिका निवडणूक (Municipal Corporation Election) जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पंढरपूर दौऱ्यासाठी निवडणूक आयोगाची (Election Commission of Maharashtra) परवानगी घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा: वारकऱ्यांच्या आग्रहामुळे मी पंढरपूरला जाणार - उद्धव ठाकरे

ही परवानगी मिळाली तरच एकनाथ शिंदेंना शासकीय महापूजेसाठी पंढरपूरात जाता येणार आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी परवानगी मिळाली की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती हाती आलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे शासकीय महापूजा करणार की नाही, हे आता निवडणूक आयोगाच्या हातात असणार आहे.

Web Title: Cm Eknath Shinde Ashadhi Ekadashi Chief Minister Election Commission

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top