Rain Alert: राज्यात पावसाचा यलो अलर्ट; CM शिंदेंच्या सतर्क राहण्याच्या सूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde
Rain Alert: राज्यात पावसाचा यलो अलर्ट; CM शिंदेंच्या सतर्क राहण्याच्या सूचना

Rain Alert: राज्यात पावसाचा यलो अलर्ट; CM शिंदेंच्या सतर्क राहण्याच्या सूचना

गणेशोत्सवापूर्वी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र गणेश चतुर्थीनंतर पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. आता गणेश विसर्जनाच्या काळातही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई ठाण्याासह कोकण किनारपट्टीच्या भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा: Rain Updates: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीची मदत; मुख्यंत्र्यांची घोषणा

दरम्यान, राज्यभरात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे चार पाच दिवस राज्यभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यताही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत.

हेही वाचा: Mansoon Update: राज्यात पावसाचा जोर वाढला, चार जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट

पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला आहे. मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची माहिती घेतली आहे. या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत पोहोचविण्याच्या सूचना देतानाच मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Web Title: Cm Eknath Shinde Monsoon Rain Yellow Alert Heavy Rain Weather Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..