संजय राठोडांनी CM शिंदेंवर दबाव आणत मंत्रिपद मिळवलं?

समर्थक आमदारांच्या दबावामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढताना दिसत आहे.
Sanjay Rathod Eknath Shinde
Sanjay Rathod Eknath ShindeSakal

शिंदे फडणवीस सरकारचा गेल्या महिन्याभरापासून खोळंबलेला विस्तार अखेर काल पार पडला. पहिल्या टप्प्यात भाजपा आणि शिंदे गटातल्या प्रत्येकी ९ मंत्र्यांचे शपथविधी झाले. मात्र यात शिंदे गटात मतमतांतरं, वाद पाहायला मिळाले. मुख्यमंत्री शिंदेंना अनेकांची नाराजीही ओढवून घ्यावी लागली. (CM Eknath shinde Maharashtra Cabinet Expansion)

पहिल्या टप्प्यातल्या मंत्रिमंडळ विस्तारात काल संजय राठोड (Sanjay Rathod) यांनीही शपथ घेतली. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानं महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागला होता. हे प्रकरण भाजपाने चांगलंच लावून धरलं होतं. मात्र आता भाजपासोबतच्या सत्तेत त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळाल्यानं त्यावरुन टीका होत आहे.

Sanjay Rathod Eknath Shinde
"अधिवेशन संपताच पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार, तेव्हा होणार आमच्या नावाचा विचार"

संजय राठोडांना मंत्रिपद देण्याचं कारण काय?

समर्थक आमदारांच्या दबावतंत्रामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्यानं राठोडांना मंत्रिपद नाकारण्यात आलं होतं. मात्र संजय राठोडांनी एकनाथ शिंदेंकडे (Eknath Shinde) आपली नाराजी व्यक्त केली आणि त्यांच्यावर दबाव टाकला आणि मंत्रिमंडळ विस्तार यादीत नाव टाकून घेतलं.

Sanjay Rathod Eknath Shinde
Sanjay Rathod : ...म्हणून संजय राठोडांना मंत्रिमंडळात स्थान; मुख्यमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं

आपल्याला पूजा चव्हाण प्रकरणाच्या चौकशीत क्लिन चिट मिळाल्याचा दावा करत संजय राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर दबाव आणल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संजय राठोडांना मंत्रिपद दिल्याबद्दल भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आपला विरोध दर्शवला होता. संजय राठोडांना मंत्रिपद मिळणं चुकीचं आहे, त्यांच्याविरोधातला आपला लढा सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com