Shivbhojan Thali
Shivbhojan ThaliSakal

Thane : पक्षातल्या संघर्षाचा फटका; मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शिवभोजन थाळीची उपेक्षा

एकनाथ शिंदेंचं सरकार आल्यावर त्यांनी शिवभोजन थाळी बंद होणार नाही, असं आश्वासन दिलं होतं.
Published on

शिवसेनेतल्या संघर्षामध्ये गोरगरीबांना दिलासा देणाऱ्या शिवभोजन थाळीची मात्र उपेक्षा होताना दिसत आहे. शिवभोजन थाळी बंद केली जाणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. त्याप्रमाणे ती बंद नाही झाली पण अनुदान मात्र थकवण्यात आलं आहे.

Shivbhojan Thali
Sanjay Shirsat: शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; उपचारासाठी मुंबईला रवाना

शिवसेनेतल्या वादानंतर महाविकास आघाडीचं सरकार पडलं. त्यानंतर आता शिवभोजन थाळीचं काय होणार असा प्रश्न उभा राहिला होता. त्यानंतर मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही थाळी सुरूच राहणार असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर ही थाळी अद्याप बंद झालेली नाही. मात्र या शिवभोजन थाळीच्या नवी मुंबई आणि ठाण्यातल्या केंद्रांचे तीन महिन्याचे अनुदान थकले आहे.

Shivbhojan Thali
Eknath Shinde: ग्रामपंचायत निवडणुकांवर CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमची भूमिका...

महाविकास आघाडी सरकारच्या काळात दर १५ दिवसांनी शिवभोजन थाळीसाठी अनुदान काढण्यात येत होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात शिवभोजन थाळीची ६० केंद्रं आहेत. पण या सगळ्याच केंद्रांचं कोट्यवधींचं अनुदान अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडे थकलेलं आहे. कोरोना काळामध्ये तसंच त्यानंतर शिवभोजन थाळीचा गोरगरीबांना आधार होता. मात्र हे अनुदान रखडल्याने आता केंद्र चालकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com