एकनाथ शिंदे - भाजपा काँग्रेसही फोडणार? धक्कातंत्राने होणार मंत्रिमंडळ विस्तार

Eknath Shinde - Devendra Fadnavis
Eknath Shinde - Devendra FadnavisSakal

एकनाथ शिंदेंनी महत्त्वाच्या मंत्र्यांसह आमदारांना घेऊन बंड करत शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का दिला. कोलमडलेल्या शिवसेनेवर संकट आणत त्यांनी आपला वेगळा गट स्थापन करत भाजपासोबत सरकारही आणलं. आता शिवसेनेनंतर या शिंदे गटाने आपला मोर्चा काँग्रेसकडे वळवल्याचं दिसत आहे. काँग्रेसही लवकरच फुटण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

Eknath Shinde - Devendra Fadnavis
Shivsena: ठरलं! शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा एकनाथ शिंदेच कायम राखणार

सरकार स्थापन झाल्यावर जवळपास महिन्याभराने मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र हा विस्तारही केवळ पहिल्या टप्प्यातला. आता पुन्हा साधारण महिन्याभराचा काळ गेला असून दुसऱ्या टप्प्यातला विस्तार अद्याप प्रलंबित आहे. आता हा दुसऱ्या टप्प्यातला मंत्रिमंडळ विस्तार धक्कातंत्राने होण्याची माहिती मिळत आहे. यामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असून जुन्या नेत्यांचा आणि माजी मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde - Devendra Fadnavis
Ajit Pawar: एकनाथ शिंदे चूक की बरोबर, जनताच ठरवेल; अजित पवारांच्या विधानाची चर्चा

दुसऱ्या टप्प्यात दोन महिलांनाही मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचेही दोन मंत्री या मंत्रिमंडळात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसचा एक मोठा गट येत्या काही दिवसांत भाजपात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन माजी मंत्र्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत हा विस्तार पूर्ण होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com