EKnath Shinde: ठाकरे गट व शिवसेना दोन्ही वेगळे; CM शिंदेंच्या ट्वीटची चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eknath shinde on uddhav thackeray
ठाकरे गट व शिवसेना दोन्ही वेगळे; CM शिंदेंच्या ट्वीटची चर्चा

EKnath Shinde: ठाकरे गट व शिवसेना दोन्ही वेगळे; CM शिंदेंच्या ट्वीटची चर्चा

शिवसेना कोणाची, एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची हा प्रश्न अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र तरीही मुख्यमंत्री शिंदेंनी एक ट्वीट करत शिवसेना आपलीच असा दावा केल्याचं दिसून येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाबद्दल मुख्यमंत्री शिंदेंनी हे ट्वीट केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्वीट करत एक पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरच्या माध्यमातून त्यांनी राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये झालेल्या विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे म्हणतात, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना - भाजपा युती सरकारला जनतेचा कौल. शिवसेना - भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना - भाजपा युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार.

हेही वाचा: सरकार पडलं तरी बंगल्यांचा मोह सुटेना; शिंदे गटानेही सोडला नाही ताबा

यासोबत त्यांनी एक पोस्टर शेअर केलं आहे. ज्यामध्ये निकालाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये कोणत्या पक्षाच्या किती जागा आहेत, हे नमूद करण्यात आलं आहे. त्यात शिवसेनेच्या ४० जागा आणि उद्धव ठाकरे गटाच्या २७ जागा असा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: CM शिंदे आजारी, फडणवीस दिल्लीत; आमदारांची धाकधूक वाढली!

सर्वोच्च न्यायालयात शिंदे विरुद्ध ठाकरे गटाची सुनावणी ८ ऑगस्टला होणार आहे. त्या दिवशी हा निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र त्या आधीच एकनाथ शिंदेंनी हे सूचक ट्वीट केलं आहे. तसंच शिवसेना भाजपा युती सरकारला जनतेचा कौल असंही म्हटलं आहे.

Web Title: Cm Eknath Shinde Tweet Shivsena Uddhav Thackeray Supreme Court Of India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..