CM शिंदे आजारी, फडणवीस दिल्लीत; आमदारांची धाकधूक वाढली!

काल दिल्लीहून परत आलेले देवेंद्र फडणवीस आज पुन्हा दिल्लीला रवाना झाले आहेत.
CM Eknath Shinde Devendra Fadnavis Shivsena MLA
CM Eknath Shinde Devendra Fadnavis Shivsena MLASakal

राज्यात शिंदे फडणवीस सरकार येऊन आता महिना उलटला असला तरी मंत्रीमंडळ विस्तार मात्र होऊ शकलेला नाहीये. मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय, आणि या विस्ताराच्या वेगवेगळ्या तारखा देण्यात येतायेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी दौऱ्यांचा धडाका लावलाय. राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांनी दौरे केले, सभा घेतल्या. या सगळ्या दौऱ्यांमुळे ते आजारी पडले आणि आता त्यांना विश्रांती घेण्याची सल्ला दिला आहे. (CM Eknath Shinde Devendra Fadnavis)

CM Eknath Shinde Devendra Fadnavis Shivsena MLA
मुख्यमंत्री शिंदेंची प्रकृती बिघडली; सर्व प्रशासकीय बैठका रद्द

दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीमध्ये भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी ते घेण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार झाला तर इच्छुकांची संख्या मोठी आहे त्यामुळे कोणाची वर्णी लागणार हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे सगळ्यांची मनधरणी करणं हा शिंदे फडणवीस यांच्या समोरील मोठा प्रश्न आहे.

पनवेल येथे झालेल्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी इच्छुकांना इशारा दिला होता. तर दुसरीकडे शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत ५० आमदार आले आहेत. त्यातील अनेक आमदार हे महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते, त्यामुळे या ५० आमदारांना खुश करण्याची कसरत शिंदेंना करावी लागणार आहे.

CM Eknath Shinde Devendra Fadnavis Shivsena MLA
CM शिंदे एक-दोन तासच झोपतात; केसरकरांनी सांगितलं आजाराचं कारण

एकीकडे हे सगळं सुरु असताना दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षाची सुनावणी सुरु आहे. या सुनावणीत शिंदे सरकारचं भवितव्य ठरणार आहे. १६ आमदारांच निलंबन होणार का ? शिंदे सरकार टिकणार का, शिवसेना नेमकी कोणाची ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या सुनावणीवर अवलंबून आहे. आता ही सुनावणी देखील लांबण्याची चिन्ह आहेत. पुढची सुनावणी ८ ऑगस्टला होणार आहे, त्या सुनावणीत निकाल लागतो की आणखी नवीन तारीख मिळते हे देखील पाहावं लागणार आहे.

या सगळ्या पेचामुळे मंत्रीमंडळ विस्तारात देखील शिंदे फडणवीसांना अडचणी येतायेत. मंत्री मंडळ विस्तार होत नसल्याने इकडे बंडखोर आमदारांमध्ये देखील अस्वस्थता वाढतीये. महिना उलटला तरी ना कुठल्या आमदाराला मंत्रीपद मिळालंय ना कुठल्या महामंडळाचं अध्यक्ष पद. त्यामुळे दिवसेंदिवस ही अस्वस्थता वाढताना दिसतीये.

त्यामुळेच आता तब्येत बरी नसताना देखील एकनाथ शिंदे आज संध्याकाळी बंडखोर आमदारांसोबत बैठक घेतायेत. आता या बैठकीत ते आमदारांना कुठला सल्ला देतात हे पाहावं लागेल.

तर दुसरीकडे मंत्रीमंडळ विस्तार आता ८ तारखेच्या सुनावणी आधी होतो की सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीची वाट पाहिली जातेय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com