esakal | शिवसेनेचे मुख्यमंत्री पदाबाबतचे काढले बॅनर
sakal

बोलून बातमी शोधा

Cm post banner Removed in mumbai

शिवसेनेचे मुख्यमंत्री पदाबाबतचे बँनरवर कारवाई

शिवसेनेचे मुख्यमंत्री पदाबाबतचे काढले बॅनर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री बनावे असा मजकूर असलेली शिवसेनेचे बॅनर्स वांद्रे परिसरात झळकली होती. आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यात झाल्यानंतर शिवसेनेची ही मुख्यमंत्रिपदाबाबतचे बॅनर्स मुंबई महानगरपालिकेने हटवली आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शिवसैनिकांनी मुख्यमंत्री पदाबाबत बॅनर्स झळकावून शिवसेनेवर खोटारडेपणाचा आरोप करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आव्हान दिले होते. मुंबई शहरात हे बॅनर अनेक ठिकाणी लावण्यात आले होते. शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यात आला होता. पंरतु, आता हे बॅनर महापालिकेकडून काढण्यात आले आहेत.

शरद पवारांनी आमदारांच्या रांगेत दिले त्यांना स्थान; आमदारही भारावले

दरम्यान, महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळत आहे. शिवसेना मुखमंत्री पदावर आग्रही असून त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पक्षासोबत असलेली युतीही तोडली आहे.

loading image