दाऊद - मुंबई बॉम्बस्फोटावर निर्णय घेण्यात ठाकरे सरकार अपयशी- CM एकनाथ शिंदे

दाऊद - मुंबई बॉम्बस्फोटावर निर्णय घेण्यात ठाकरे सरकार अपयशी
CM Shinde Eknath Shinde News Dawood Ibrahim News,
CM Shinde Eknath Shinde News Dawood Ibrahim News, esakal

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, मुंबई बॉम्बस्फोट, वीर सावरकर आणि हिंदुत्वाशी संबंधित खटल्यांवर निर्णय घेण्यात ठाकरे सरकार अयशस्वी ठरले असा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाण साधला आहे.(CM Eknath Shinde Latest Marathi News)

एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखतीत मुख्यमंत्री शिंदे यांनी मविआ सरकारवर हल्लाबोल केला आहे.

दाऊद इब्राहिम हा 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आहे ज्यात 257 लोक मारले गेले होते. मे महिन्यात ईडीने दाऊद इब्राहिमशी जोडल्या गेलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिकविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी दाऊद इब्राहिम आणि मुंबईतील निरपराध लोकांचे जीव घेण्यास जबाबदार असलेल्यांशी थेट संबंध असलेल्यांना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कशी काय साथ देऊ शकते, असा सवाल शिंदे यांनी केला.

CM Shinde Eknath Shinde News Dawood Ibrahim News,
भाजपाप्रदेशाध्यक्ष पदासाठी शेलार, राम शिंदेंच्या नावाची चर्चा

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढले होते. मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. यामुळे जेव्हा जेव्हा मुद्दा हिंदुत्वाचा आला की सावरकरांचा. मुंबई बॉम्बस्फोट आणि दाऊद इब्राहिमचा मुद्दा पुढे आला, आम्ही निर्णय घेऊ शकलो नाही. त्यामुळे ठाकरे सरकार संबंधित खटल्यांवर निर्णय घेण्यात अयशस्वी ठरले. अशा आरोप शिंदे यांनी यावेळी केला.

तसेच, आम्ही आमचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्व विचारधारा, त्यांची भूमिका पुढे नेण्याचे ठरवले आहे. 50 आमदारांनी असे पाऊल उचलले तर त्यामागे आणखी मोठे कारण असावे. क्षुल्लक कारणासाठी इतका मोठा निर्णय कोणी घेत नाही. असा निर्णय एक नगरसेवकही घेत नाही. 50 आमदारांनी असा निर्णय का घेतला? याचा विचार करण्याची गरज होती. असे शिंदे यांनी म्हटले आहे.

CM Shinde Eknath Shinde News Dawood Ibrahim News,
शिंदे-फडणवीसांचे सरकार म्हणजे ‘उधारीचा माल’; सेनेचा हल्लाबोल

यासोबतच, आम्ही काहीही बेकायदेशीर करत नाही. या देशात नियम, कायदे आणि राज्यघटना आहेत आणि त्यांनुसार आम्हाला काम करायचे आहे. आज आमच्याकडे दोन तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत आहे, त्यामुळे आम्ही घेतलेला निर्णय कायदेशीर आणि वैध आहे. सभापतींनीही आम्हाला ओळखले. आमच्या विरोधात न्यायालयात धाव घेणाऱ्यांना न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

आम्ही काहीही बेकायदेशीर केलेले नाही आणि ज्यांनी बेकायदेशीर गोष्टी केल्या, त्यांच्याविरुद्ध न्यायालय निर्णय देईल. फ्लोअर टेस्ट आणि स्पीकरच्या निवडणुका झाल्या आणि सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. या सरकारला 170 आमदारांचा पाठिंबा आहे आणि हे एक मजबूत सरकार आहे, असेदेखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com