भाजपाप्रदेशाध्यक्ष पदासाठी शेलार, राम शिंदेंच्या नावाची चर्चा

भाजपाप्रदेशाध्यक्ष पदासाठी शेलार, राम शिंदेंच्या नावाची चर्चा

मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष पदासाठी नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता असून, यासाठी आशिष शेलार आणि राम शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास भाजपा प्रदेशाध्यक्षपदी नव्या चेहऱ्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. (Maharashtra BJP State Precedent News In Marathi )

भाजपाप्रदेशाध्यक्ष पदासाठी शेलार, राम शिंदेंच्या नावाची चर्चा
दाऊद - मुंबई बॉम्बस्फोटावर निर्णय घेण्यात ठाकरे सरकार अपयशी- CM एकनाथ शिंदे

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारचा मंत्रिमडंळ विस्तार येत्या आठवडाभरात होण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. असे झाल्यास भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नव्या चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते. त्यासाठी आशिष शेलार आणि राम शिंदे यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

भाजपाप्रदेशाध्यक्ष पदासाठी शेलार, राम शिंदेंच्या नावाची चर्चा
माझ्या 'डेथ सर्टिफीकेट'वरही औरंगाबादचेच नाव हवं; इम्तियाज जलील आक्रमक

राम शिंदे यांची नुकतीच विधानपरिषदेच्या निवडणुकीत निवडणून आले आहेत. त्याशिवाय त्यांनी याआधी भाजपची प्रमुख खाती आणि पदं सांभाळली आहेत. चंद्रकांत पाटलांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यकाळ येत्या फेब्रुवारीमध्ये संपणार आहे. त्यामुळे या पदावर जर नव्या चेहऱ्याची वर्णी लागली तर, मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर त्यांचा कार्यकाळ फेब्रुवारीपासून सुरू होऊ शकतो अशी चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com