esakal | खडसे, राजू शेट्टींचा पत्ता कट?, राज्यपालांचा नावांना आक्षेप
sakal

बोलून बातमी शोधा

खडसे, राजू शेट्टींचा पत्ता कट?, राज्यपालांचा नावांना आक्षेप

खडसे, राजू शेट्टींचा पत्ता कट?, राज्यपालांचा नावांना आक्षेप

sakal_logo
By
नामदेव कुंभार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत ही भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा मागील 9 महिन्यांपासून प्रलंबित आहे. या मुद्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट झाली. या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात गेले काही दिवस संघर्ष सुरू होता. त्यामुळे, या भेटीतून तोडगा निघणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, सुत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या काही नावांबाबत राज्यपालांनी आक्षेप घेतलाय. त्यावरून राज्यपाल आणि राज्य सरकार हा संघर्ष आहे. राज्यपालांनी माजी मंत्री एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी यांच्या नावाला आक्षेप घेतला असल्याचं समजतेय.

मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी या नावांबाबत राज्यपालांचे आक्षेप आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला कशी काय मान्यता द्यावी, असा प्रश्न राज्यपालांच्या कार्यालयासमोर आहे. तसेच राष्ट्रवादीच्या कोट्यातून शिफारस करण्यात आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नावावरही आक्षेप आहेत. विविध आंदोलनात शेट्टी यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या नावावर फेरविचार करण्याची सूचना राज्यपाल देऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: अनिल देशमुख प्रकरण: CBI ने आपल्याच आधिकाऱ्याला केली अटक

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातून राजू शेट्टी यांचं नाव वगळण्यात आले आहे. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला असला तरी तरीही ते सरकार विरोधात पदयात्रा करत आहेत. त्यामुळे त्यांचं नाव वगळण्यात आल्याचं सांगितलं जातेय. राष्ट्रवादी काँग्रेस कडून हेमंत टकले यांचं नाव देण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने कुणाचा पत्ता कट केलाय? याची चर्चा सुरु आहे.

हेही वाचा: भय इथलं संपत नाय; कोरोनाचा आणखी एक व्हेरियंट, लसही अप्रभावी

राज्यपालांना भेटल्यानंतर अजित पवार म्हणाले?

या बैठकीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, आम्ही गेल्या आठवड्यातच वेळ मागितली होती. पण तेंव्हा काही अडचणीमुळे त्यांनी वेळ दिली नव्हती. त्यावेळी त्यांनी १ तारखेची वेळ दिली होती. त्यानुसार आज आम्ही भेटलो. नेहमीची एक पद्धत असते, त्यानुसार राज्यपालांना राज्यात जे सुरुय त्याबाबत माहिती दिली जाते. त्यानुसार, आता सध्या राज्यात पावसाची जी परिस्थिती आहे ती दिली. पावसाच्या काळात धरणाची जी परिस्थिती आहे, त्याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर मागे 12 राज्यपाल नियुक्त कॅबिनेटचा ठराव झाला होता. त्याबाबतची पुढची कारवाई होण्याबाबत चर्चा करण्यासाठी आली. जर याबाबत लवकर निर्णय घेतला तर योग्य होईल. ती विनंती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

हेही वाचा: विणाबद्दल अश्लिल शब्दांचा वापर, शिव ठाकरेने घडवली अद्दल

राज्यपालांचं काय म्हणणं?

अजित पवार म्हणाले की, आमची साधारण एक तासात अनेक विषयांवर चर्चा झाल्या. राज्यपालांनीही अनेक बाबतीत प्रश्न विचारले. त्यानुसार अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यातच राज्यपालांकडून आमदारांच्या नियुक्तीचाही एक विषय होता. राज्यपालांनी आमचं ते म्हणणं ऐकून घेतलं. आमदारांच्या या यादीवर कुठल्याही प्रकारचे आक्षेप वगैरे त्यांनी घेतलेले नाहीत. आम्ही फक्त त्यांना आठवण करुन दिली. कधी मान्यता द्यायची तो जरुर त्यांचा अधिकार आहे. त्यावर ते म्हणाले, की ठिकाय मी तुमचं एकून घेतलंय. मी यावर निर्णय घेईन. ईडीच्या दबावाबद्दलची कसलीही चर्चा त्यांच्याशी झालेली नाही. कोरोना, पाऊस, येणारे कृतीकार्यक्रम याबाबतची माहिती त्यांना देण्यात आली.

loading image
go to top