राजीनाम्याबाबत CM उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; ज्यांना मी नकोय त्यांनी...

Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySakal Digital
Updated on

(CM Uddhav Thackeray On Maharashtra MVA Crisis)

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार दोन्ही आडचणीत सापडले आहे. दरम्यान शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे यांच्या गोटात सामिल झाले आहेत. यादरम्यान शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. उद्धव ठाकरे राजीनाम्याबाबत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलंय. मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. पण उद्धव ठाकरे CM पदी नको हे समोर येऊन सांगावं, असं त्यांनी बंड करणाऱ्या आमदारांना सांगितलंय.

मी कुणाला भेटत नाही हे म्हणणं बरोबर आहे. माझं काम आता अव्याहतपणे सुरु आहे. शिवसेना कदापी हिंदुत्वापासून दूर जाणार नाही. शिवसेना प्रमुख सांगायचे की, शिवसेना हिंदुत्वापासून दूर जाणार नाही. हिंदुत्वाबद्दल बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे. ही बाळासाहेबांची शिवसेना नाही अशी बातमी पसरवण्यात आली. २०१४ एकट्याच्या ताकदीवर ६३ आमदार शिवसेनेचे आमदार निवडून आले ती पण हिंदुत्वावर, असं ठाकरेंनी सांगितले.

Uddhav Thackeray
भाजपकडून शेवटच्या क्षणी खेळी, सदाभाऊ खोतांना मुंबईला बोलावलं

राजीनामा देण्यास तयार

राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मला दु:ख झालंय, धक्का बसलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाली की उद्धव ठाकरे सीएमपदासाठी अयोग्य आहेत तर मी समजू शकलो असतो. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर काय करायचं हा प्रश्न आहे. माझ्या त्यांना प्रश्न आहे की तुम्ही इथे येऊन का बोलले नाहीत. सूरतला जाऊन बोलायची गरज काय होती. एकाही आमदाराने समोर येऊन स्टेटमेंट दिले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको, तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. आज संध्याकाळपासून मी माझा मुक्काम वर्षावरुन मातोश्रीवर हलवण्यास तयार आहे.

राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो

जे आमदार गायब आहेत त्यांनी माझ्या राजीनाम्याचं पत्र घेऊन राजभवनात जावं. मला कोव्हिड झाल्याने मी राजभवनात जाऊ शकत नाही. हा लाचारीचा प्रसंग नाही. अशी अनेक संकट आम्ही पाहिलीयेत. जोवर माझ्यासोबत बाळासाहेबांनी जोडून दिलेला शिवसैनिक आहे तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही, असं उद्धव ठाकरेंनी ठणकावले.

शिवसेना पक्षप्रमुखपद सोडायला तयार

ज्या शिवसैनिकांना वाटत असेल की मी शिवसेनेचे नेतृत्व करण्यास लायक नाही, त्यांनी मला येऊन सांगावं. मी पक्षप्रमुख पद सोडायला तयार असल्याचं विधान उद्धव ठाकरेंनी केले. मी पद सोडल्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मला आनंद आहे, पण समोर येऊन बोला. तुम्ही या.. माझ्याशी बोला. फोन करुन सांगा. तुम्ही आम्हाला नकोत हे स्पष्ट सांगा. मी या क्षणाला मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. पद येतात आणि जातात, तुमचं काम आणि त्यावर जनतेने दिलेले प्रेम हीच कमाई असते, असंही त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Devendra Fadnavis
Maharashtra Latest Marathi News Live Update
Satavahana Era Relics Found in Junnar Shed Light on Ancient Trade and Culture
Why are farmers opposing Shaktipeeth Highway?
Marathi News Esakal
www.esakal.com