esakal | पंकजा मुंडेंच्या ट्विटला उद्धव ठाकरेंचे उत्तर, म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

CM Uddhav Thackeray replies to Pankaja Munde Tweet

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंकजा यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या होत्या. आज उद्धव यांनी त्या ट्विटचे उत्तर देत धन्यवाद मानले आहेत. 

पंकजा मुंडेंच्या ट्विटला उद्धव ठाकरेंचे उत्तर, म्हणाले...

sakal_logo
By
टीम ईसकाळ

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे मागील 2 दिवस काही न काही कारणाने चर्चेत आहेत. आजही त्या चर्चेत आल्या, ते म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना ट्विटरवर दिलेल्या उत्तरामुळे! मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंकजा यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या होत्या. आज उद्धव यांनी त्या ट्विटचे उत्तर देत धन्यवाद मानले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

पंकजा यांनी उद्धव यांना 'आदरणीय बाळासाहेबांच्या स्वप्नांना व मराठी माणसाला असलेल्या अपेक्षा आपण पूर्णत्वाकडे घेऊन जाल हीच ईश्वर चरणी प्रार्थना!!' असे ट्विट करत शुभेच्छा दिल्या होत्या. या ट्विटला उत्तर देत उद्धव ठाकरे म्हणतात, 'आपले मनःपूर्वक धन्यवाद पंकजा ताई मुंडे! 'राज्याचे हित प्रथम' याच संस्कृतीने आणि परंपरेने महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल आणि स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल असा विश्वास मी तुम्हाला देतो.' या भावनिक ट्विटमुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

Chandrayaan 2 : मोठी बातमी! विक्रम लँडर सापडला, नासाने केले फोटो ट्विट

पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहित, मी 12 डिसेंबरला तुमच्याशी बोलायला येत आहे, असे सांगितले होते. त्या दिवशी त्या काहीतरी मोठा निर्णय घेतील अशीही चर्चा चालू आहे. तर काल पंकजा यांनी ट्विटरवरून आपले पद व भारतीय जनता पक्षाचे नाव हटवत पुन्हा एकदा चर्चेला वळण दिले आहे. त्यामुळे 12 डिसेंबरला त्या काय बोलतील याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

पंकजा मुंडे यांचा भाजपला पुन्हा धक्का; ट्विटर अकाऊंटवरून भाजपचे नाव गायब

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी बोलताना पंकजा मुंडे भाजपत आहेत आणि राहतील हे स्पष्ट केले. ते म्हणाले, पंकजा मुंडे या पक्ष सोडणार अशा बातम्या पसरत आहेत. त्या सर्व खोट्या आहेत. पंकजा मुंडे यांनी पक्षात मोठी पदे भूषवली आहेत. दोनदा आमदार आणि एकदा मंत्रीसुद्धा राहिल्या आहेत. त्या पक्ष सोडण्याचा विचार करणार नाहीत.

पंकजा मुंडे 12 डिसेंबरला राजकीय भूकंप घडविणार का?