"आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर.."; CM ठाकरेंचा केंद्रावर निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cm uddhav thackeray slams modi govt on petrol diesel prices and lpg cylinder gas

"आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर.."; CM ठाकरेंचा केंद्रावर निशाणा

केंद्र सरकारने आज पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करण्याचा सोबतच घरघुती सिलेंडरच्या किंमतीत सबसीडी देण्याचा निर्णयाची घोषणा केली आहे. या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CMUddhav Thackeray) यांनी मात्र केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आधी भरमसाठ किंमती वाढवायच्या, आणि नंतर मात्र त्या नाममात्र कमी करण्याचा देखावा करायचा अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

केंद्र सरकारनं आज (शनिवार) पेट्रोल आणि डिझेलवरील (Petrol and Diesel) उत्पादन शुल्कात कपातीची घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 8 रुपये आणि 6 रुपये प्रति लिटरनं कमी करणार असल्याचे सांगितले आहे. यासोबतच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानही जाहीर करण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणेचं कौतुक केलं आहे.

यानंतर उध्व ठाकरे यांनी ट्वीट करत केंद्र सरकारवर निशाणा साधलाय, त्यांनी "आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना न अडकवता ६-७ वर्षांपूर्वीच्या अबकारी कराइतकी कपात केल्यास देशातील नागरिकांना दिलासा मिळेल", असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: इंधन दर कपातीवर शरद पवारांची चार शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारचे कौतुक करत केंद्रातील मोदी सरकार हे या देशातील सामान्य माणसाचे सरकार आहे, हेच पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिद्ध केले आहे, गरिब कल्याण हा त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आणि त्यासाठी ते सतत झटत असतात, या निर्णयांमधून त्यांनी हेच प्रत्यंतर पुन्हा एकदा दिले आहे, असे सांगत निर्णयाचे स्वागत केले. सोबतच

हेही वाचा: मोदी सरकार हे सामान्यांचे सरकार, इंधन दर कपातीनंतर फडणवीसांचे ट्वीट

आता माझी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की, त्यांनी पुढाकार घेत पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करावी आणि सामान्यांना आणखी दिलासा द्यावा, असे अवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाररे आणि राज्य सरकारला केले आहे.

हेही वाचा: ग्राहकांना दिलासा! पेट्रोल 9.50 तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त

Web Title: Cm Uddhav Thackeray Slams Modi Govt On Petrol Diesel Prices And Lpg Cylinder Gas

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top