मुख्यमंत्री ठाकरे यांच्या एका निर्णयाने पंकजांसह भाजपला मोठा धक्का!

DEVENDRA.jpg
DEVENDRA.jpg

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता ठाकरे सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. ठाकरे यांनी आधीच्या भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, आरे आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर हैदराबाद-मुंबई बुलेट ट्रेनच्या कामालाही स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. यानंतर आता भाजपला मोठा धक्का देणारा निर्णय घेत ग्रामविकास विभागाच्या 2 हजार 515 कामांना स्थगिती देण्यात आली आहे.

ग्रामीण भागात मुलभूत सुविधा देणाऱ्या या 2515 कामांना स्थगिती दिली आहे. ग्रामविकास खातं आधीच्या फडणवीस सरकारमध्ये पंकजा मुंडे यांच्याकडे होते. त्यांनी घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देऊन सरकारने मोठा झटका दिला आहे.

विधानसभा आचारसंहितेच्या आधी कोट्यवधींच्या विकास कामांना मंजुरी देऊन ती वितरित करण्यात आली होती. आता महाविकास आघाडीने ही कामे थांबवण्याचा जीआर काढला आहे. विधानसभा आचारसंहितेच्या आधी पंकजा मुंडे यांच्या ग्रामविकास विंभागाने २५१५ योजनेअंतर्गत करोडो रूपयाची विकास कामे भाजपा आमदाराच्या मतदार संघात दिली होती, तसेच ग्रामीण भागांत पर्यटन विकास अंतर्गत २ ते २५ कोटी विकास कामांना ही स्थगिती दिली. यामुळे भाजपला मोठा झटका बसल्याचे म्हटले जाते.

एनसीपी आणि काँग्रेस सरकार 2014 साली गेल्यावर तत्कालीन नवीन भाजपा सेना सरकारच्या ग्रामविकास विभागानेदेखील जीआर काढत स्थगिती दिली होती. आचारसंहितेच्या आधी निकटवर्तीय अधिक निधी देण्यात येत असतो, आता या नव्या जीआरमुळे पंकजा मु्ंडे यांनी दिलेल्या ग्रामीण विकास कामाना कात्री लागली आहे. शिवसेना-एनसीपी-काँग्रेस सरकारने मुद्दाम ही खेळी केल्याचे म्हटले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com