
राज्यभर शिवसेनेचा झंझावात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभा होणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानांतर्गत आज मुंबईत एक सभा घेणार आहेत. आज संध्याकाळी सात वाजता होणाऱ्या या सभेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. दरम्यान, या सभेच्या आधीच शिवसेनेकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं शिवसेनेने जाहीर केलं आहे.
हेही वाचा: "काँग्रेस-राष्ट्रवादीचा दबाव..."; सभेआधीच उद्धव ठाकरेंना मनसेचं आव्हान
८ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर असतील. त्यानंतर विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागाचा दौरा करतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे हे दौरे विभागवार असतील. हे नियोजन करण्याचं काम सध्या सुरू आहे. आजची सभा झाल्यानंतर मुख्यमंत्री या दौऱ्याला सुरूवात करणार आहेत. मुख्यमंत्री राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन शेतकरी, कष्टकरी आणि शिवसैनिकांची भेट घेणार आहेत.
हेही वाचा: "ज्यामुळे तुमची चूल पेटली.."; सभेआधी राणांनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं!
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंनी उपस्थित केलेला भोंग्यांचा मुद्दा, हिंदूत्व आणि त्या अनुषंगाने राज ठाकरेंसह भाजपाने केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सभा घेत आहेत. शिवसंपर्क अभियानाला आज या सभेने सुरूवात होणार आहे.
Web Title: Cm Uddhav Thackeray Will Visit In Different Areas Of Maharashtra Says Shivsena
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..