कौतुकास्पद ! मुख्यमंत्र्यांनी ड्रायव्हरला दिली सुट्टी; स्वत:च चालवत आहेत गाडी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 April 2020

कामाचा ताण वाढलेला असतानाही मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत या बैठकांना पोहोचत आहेत. त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला सुटी दिली आहे. गेल्या आठवडाभरापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: कार चालवत आहेत.

मुंबई : कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असताना सोशल डिस्टंन्सिंग कटाक्षाने पाळा असं तज्ज्ञ सांगत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सगळ्याच ठिकाणी त्याचं पालन सुरू केलंय. बैठकांसाठी त्यांना मंत्रालय, वर्षा, महापालिका मुख्यालय असा प्रवास करावा लागतोय. कामाचा ताण वाढलेला असतानाही मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत या बैठकांना पोहोचत आहेत. त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला सुटी दिली आहे. गेल्या आठवडाभरापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: कार चालवत आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काल (ता.३१) मुंबई महापालिकेत आढावा बैठक होती. त्यासाठी मातोश्रीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: कार चालवत बीएमसी मुख्यालयात आले. या कारमध्ये मागच्या सीटवर आदित्य ठाकरे बसले होते. सोशल डिस्टंन्सिंगचं काटेकोर पालन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री ठाकरे सोशल मीडियाद्वारे लोकांना घराबाहेर पडू नका, सरकार जे सांगतेय त्या नियमांचं पालन करा असं सातत्याने सांगत आहेत.

देशात तुटवडा असताना भारताकडून सर्बियाला वैद्यकीय उपकरणांची निर्यात

जगभरात कोरोना व्हायरसच्या विषाणूंनी थैमान घातलेले असताना भारतातही या विषाणूंचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. रुग्णांची संख्याही आता देशात वाढताना दिसत आहे. देशात सध्या कोरोनाचे एकूण १६१३ रुग्ण आहेत. तर आतापर्यंत एकूण ३५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण १४८ रुग्णांना बरे करण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

Coronavirus : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या १६०० पार; कोणत्या राज्यात किती रुग्ण

दरम्यान, देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल डिस्टन्सिंगही पाळण्यास सांगितलं आहे. अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आल्या आहेत. मात्र लोकांनी किराणा दुकानं, भाजी बाजार, मेडिकल स्टोअर्स या ठिकाणी गर्दी किंवा झुंबड करु नये असंही आवाहन केंद्र आणि राज्य सरकारतर्फे करण्यात आलं आहे. जे लोक लॉकडाउनचे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर नाईलाजाने कारवाई करावी लागेल. मात्र तशी वेळ आणू नका असंही आवाहन सरकारने केलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cm uddhav Thackreay driving his own car and reach meetings