esakal | पुण्यात थंडीची एक्झिट; पुढील ३ दिवस ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता

बोलून बातमी शोधा

Cold exit in Pune Chance of rain with cloudy weather for next 3 days

गेल्या आठवड्यापासून शहरातील किमान तापमानात सातत्याने वाढ होत असून मंगळवारी ते १४.९ इतके नोंदले गेले. तर किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २.५ अंश सेल्सिअस वाढ झाली होती.

पुण्यात थंडीची एक्झिट; पुढील ३ दिवस ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे ः शहरातून थंडीची एक्झिट झाली असून ढगाळ वातावरणाची स्थिती उद्भवणार आहे. शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने मंगळवारी वर्तवली.

गेल्या आठवड्यापासून शहरातील किमान तापमानात सातत्याने वाढ होत असून मंगळवारी ते १४.९ इतके नोंदले गेले. तर किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २.५ अंश सेल्सिअस वाढ झाली होती. येत्या शुक्रवार (ता. १९) पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशाराही दिला आहे. मात्र त्यानंतर शहर व परिसरात हवामान कोरडे राहणार आहे, असे हवामान खात्याने नमूद केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील स्थिती ः
राज्यात मंगळवारी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भातील काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाल्याचे नोंदले गेले. तर पुढील तीन दिवस राज्यातील तुरळक भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. काही ठिकाणी गारांचा पाऊस होऊ शकतो. सध्या उत्तर मध्य महाराष्ट्र व परिसरात असलेल्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती आता विदर्भ व लगतच्या भागावर आहे. या चक्राकार वाऱ्याच्या स्थितीपासून केरळ किनारपट्टी लगत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे मध्य भारतात प्रवेश करत असल्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी पुढील तीन दिवस राज्यातील विविध भागांमध्ये हलका पाऊस तर काही ठिकाणी गारा पडू शकतील.

असा आहे पुढील अंदाज
बुधवार (ता. १७) ः मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातील तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह गारा पडण्याची शक्यता. तर विदर्भातील बऱ्याच भागांमध्ये पावसाच्या सरी पडतील.

काय सांगता! ट्रकपेक्षाही विमानाचं इंधन स्वस्त

गुरुवार (ता. १८) ः मराठवाड्यातील बऱ्याच ठिकाणी पाऊस तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातील तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह गारा पडू शकतील.

शुक्रवारी (ता. १९) ः विदर्भातील हवामान कोरडे असेल. परंतु मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पाऊस व गारा पडण्याचा अंदाज आहे.

Video: IPS कृष्ण प्रकाश यांची 'मन की बात'; मुळशी पॅटर्नचा केला 'अभ्यास'