

उत्तरेतील वारे वाढल्याने राज्यातील वातावरणात गेल्या दोन, तीन दिवसांपासून मोठा बदल झाला आहे. राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यातील पुणे, मुंबईसह अनेक शहरांचा किमान तापमानाचा पारा घसरला आहे. पुण्याचे तापमान 9.6 अंशावर आले आहे. पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात फेंगल हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात पुढील चार दिवस थंडीचा कडाका राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.