विदर्भ, उत्तर महाराष्ट्रसह मराठवाड्यात थंडीचा जोर कायम, पुढील 24 तास थंडीचा कडाका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रसह मराठवाड्यात थंडीचा जोर कायम, पुढील 24 तास थंडीचा कडाका

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रसह मराठवाड्यात थंडीचा जोर कायम, पुढील 24 तास थंडीचा कडाका

महाराष्ट्रासहीत देशाच्या काही भागात थंडीचा जोर कायम आहे. महाराष्ट्रात थंडी प्रचंड वाढली असून शहरी आणि ग्रामीण भागामध्येही थंडीची कहर सुरूच आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील 24 तास थंडीचा कडाका जाणवणार आहे.

हेही वाचा: राष्ट्रीय एकात्मता गीत 'प्यारा जम्मू काश्मीर' लाँच

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील तापमानात मोठी घट होणार असून थंडीचा जोर वाढणार आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस खाली राहण्याचा प्राथमिक अंदाज ही वर्तवण्यात आलाय.

Web Title: Cold Wave For Next 24 Hour In Vidarbha North Maharashtra And Marathwada

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top