मोठी बातमी! "या' दिवशी सुरू होणार महाविद्यालये; अकरावीचे सर्वच प्रवेश होणार ऑनलाइन, 31 ऑगस्टपूर्वी पूर्ण होणार प्रवेश प्रक्रिया 

तात्या लांडगे 
Friday, 31 July 2020

अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात नुकतीच प्राचार्यांची बैठक पार पडली. यामध्ये ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले आहेत. कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, या पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. 31 जुलैपासुन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांकडून अगोदर गूगल फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत. हा अर्ज मोबाईलवर घरातही भरता येईल अशी सुविधा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडून कागदपत्रे, पैसे नंतर घेण्यात येणार आहेत तर काही महाविद्यालयांनी वेबसाइटवर फॉर्मची लिंक दिलेली आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षकांवर जबाबदारी देण्यात आली आहे. 

सोलापूर : कोरोनाच्या संकटामुळे यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. ज्या-त्या कॉलेजच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाल्याची माहिती शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांनी दिली. 31 ऑगस्टपर्यंत प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया चालणार असून, 10 सप्टेंबरपासून महाविद्यालयांना सुरवात होणार असल्याची माहितीही त्यांनी आज दिली. 

हेही वाचा : पंढरपुरातून उद्या महायुतीच्या दूध आंदोलनाचा एल्गार ! 

अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात नुकतीच प्राचार्यांची बैठक पार पडली. यामध्ये ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले आहेत. कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, या पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. 31 जुलैपासुन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांकडून अगोदर गूगल फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत. हा अर्ज मोबाईलवर घरातही भरता येईल अशी सुविधा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडून कागदपत्रे, पैसे नंतर घेण्यात येणार आहेत तर काही महाविद्यालयांनी वेबसाइटवर फॉर्मची लिंक दिलेली आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षकांवर जबाबदारी देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे त्यांचा अर्ज भरून घेणे, त्यांना संपर्क करणे यासह विविध कामांची जबाबदारी शिक्षकांवर असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला आहे अशा विद्यार्थ्यांची महाविद्यालयात गर्दी होणार नाही, यासाठी दोन सत्रांत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलावण्यात येणार आहे. अर्ज भरल्यानंतर छाननी, त्यानंतर मेरीटनुसार यादी जाहीर होणार, त्यानंतर प्रवेश निश्‍चित होणार असल्याचे साळुंखे यांनी सांगितले. 

हेही वाचा : अरे देवा..! इथे मृत्यूनंतरही आत्म्यांना वाट पाहावी लागतेय मोक्षप्राप्तीसाठी; नातेवाईकही हळहळताहेत 

प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक 

  • अर्ज करणे : 31 ते 13 ऑगस्ट 
  • अर्ज छाननी : 14 ते 19 ऑगस्ट 
  • पहिली यादी : 20 ऑगस्ट व यादीनुसार प्रवेश प्रक्रिया सुरू 
  • दुसरी यादी : 31 ऑगस्ट व यादीनुसार प्रवेश प्रक्रिया सुरू 
  • तिसरी यादी : 7 सप्टेंबर व यादीनुसार प्रवेश प्रक्रिया सुरू 
  • संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Colleges will start from September 10, all eleventh admissions will be online