Shivsena : शंभर आचारी रस्सा भिकारी म्हणत शिवसेनेची विरोधकांना साद

shivsena uddhav thackeray
shivsena uddhav thackeraySakal

आगामी निवडणुकीसाठी सामनातून विरोधकांना साद घालण्यात आली आहे. विरोधकांची दहा तोंडे, हेच भाजपचे बलस्थान असल्याचे सामनाच्या अग्रलेखात म्हंटले आहे. आधी ईडी पीडा टळावी यासाठी अग्नी पेटवा, असे आवाहनही सामना अग्रलेखातून करण्यात आले आहे. शंभर आचारी रस्सा भिकारी असे घडू नये, विरोधकांच्या ऐक्याची खिचडी न पकणे, भाजपचे बलस्थान आहे, असे म्हणत शिवसेनेने आजच्या अग्रलेखातून विरोधकांना एकत्र येण्यासाठी आणि एकजुटीने लढण्यासाठी हाक दिली आहे.

विरोधकांना गप्प करण्यासाठी मोदी सरकार ईडी, सीबीआयसारख्या पेंद्रीय यंत्रणांचा वापर करीत आहे व या संकटांशी एकत्रित सामना करावा लागेल असे पवार यांनी सांगितले ते खरेच आहे. महाराष्ट्रात शिवसेनेसह महाविकास आघाडी एकत्र लढली तर लोकसभेच्या 35 जागा जिंकेल असे राज्याचे वातावरण आहे. जम्मू-कश्मीरात गुलाम नबी आझाद व महाराष्ट्रात शिंदे गट भाजपच्या फायद्यास येणार नाही, याबाबत कुणाच्या मनात शंका नाही. मात्र विरोधक 2024 चे लक्ष्य ठेवतात व वेगवेगळय़ा तोंडाने भाजपवर तोफा उडवतात, हा खरा प्रश्न आहे.

देश भाजपमुक्त होईल की नाही हे आता सांगता येत नाही, पण विरोधी पक्ष एकीने राहिले नाहीत तर त्यांना सत्तेपर्यंत पोहोचणे अवघड होईल, हे कसे नाकारता येईल? भाजपच्या विरोधात एकत्र यावे, असे प्रत्येक विरोधी पक्षास वाटते, पण एकत्र यावे कसे? या प्रश्नाचे उत्तर विरोधकांना शोधावे लागणार आहे. आघाडीचे नेतृत्व कोणी करावे? पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? वगैरे नंतर पाहता येईल. आधी ‘ईडी-पीडा’ टळावी यासाठी अग्नी पेटवा, खिचडी आपोआप शिजत जाईल. ‘शंभर आचारी रस्सा भिकारी’ असे घडू नये. विरोधकांच्या ऐक्याची खिचडी न पकणे, विरोधकांची दहा तोंडे हेच भाजपचे बलस्थान आहे. बाकी सर्व झूठ आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com