esakal | पूजा चव्हाण प्रकरणी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांविरोधात तक्रार; बंजारा समाजाची बदनामी  करण्याचा आरोप 

बोलून बातमी शोधा

abc}

भाजपा च्या लोकांवर कारवाई करावी.अशी मागणी राष्ट्रीय बंजारा परिषद चे युवा जिल्हा अध्यक्ष शाम सरदार राठोड (रा.गुंडी ता.मानोरा) यांनी केली आहे. 

maharashtra
पूजा चव्हाण प्रकरणी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांविरोधात तक्रार; बंजारा समाजाची बदनामी  करण्याचा आरोप 
sakal_logo
By
टीम ई सकाळ

मानोरा (जि. वाशीम) :   पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणी तपास सुरु असताना भाजपाचे काही लोक विनाकारण बंजारा समाजाची बदनामी करित असून चरित्र हनन केले जात आहे. अशा भाजपा च्या लोकांवर कारवाई करावी.अशी मागणी राष्ट्रीय बंजारा परिषद चे युवा जिल्हा अध्यक्ष शाम सरदार राठोड (रा.गुंडी ता.मानोरा) यांनी केली आहे. 

सरपण आणायला जंगलात गेले वडील, अचानक ऐकू आली डरकाळी अन् सर्वच संपलं

 मानोरा पोलिसांना आज (ता.1) मार्च रोजी तक्रार दिली. त्यात म्हटले की,पूजा चव्हाण ह्या बंजारा समाजाच्या मुलीने आत्महत्या केली.ही बाब खेदाची असून याचे आम्हाला दु:ख आहे,यामधे जो कोणी दोषी असेल त्यांना सजा मिळाली पाहिजे,मात्र भाजपा चे नेते देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, प्रसाद लाड  आदि लोक बंजारा समाजाची, पूजा चव्हाण हिचे कुटुंबाची बदनामी करुन चरित्र हनन करित आहेत.

तसेच पोलिस तपासात अडथळा निर्माण केला जात आहे.म्हणून भाजपा चे वरील नेते व मीडिया यांचे वर कारवाई करावी.अन्यथा राष्ट्रीय बंजारा परिषद तर्फे आंदोलन केले जाईल. असा इशारा तक्रारीत दिला आहे.

अमरावतीमध्ये फेब्रुवारीत कोरोना ब्लास्ट; तब्बल ९४ जणांचा मृत्यू; पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा बघून...

पूजा चव्हाण हिने काही दिवसांपूर्वी वानवडी येथील हेवन पार्क या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणामध्ये महाआघाडीतील एका मंत्र्याचे नाव जोडले गेल्याने त्यावरुन मोठ्या प्रमाणात राजकीय आरोपांच्या फैरी झडल्या. दरम्यान या प्रकरणातील तपासाबाबत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी वानवडी येथील घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानंतर वानवडी पोलिस ठाण्याला भेट दिली. या प्रकरणी अद्याप एफआयआर दाखल केलेली नसल्यामुळे त्या संतप्त झाल्या होत्या.