
जानेवारीमध्ये कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाल्याने रुग्णसंख्यासुद्धा कमी झालेली दिसून येत होती. पर्यायाने लग्नसमारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय मेळाव्यांना जणू उधाण आले होते.
अमरावती : फेब्रुवारी महिना अमरावतीकरांसाठी अतिशय चिंताग्रस्त ठरला. 28 दिवसांत तब्बल 13 हजार 63 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत, तर 94 जणांचा मृत्यू झाला. विभागात तसेच राज्यात अमरावती जिल्ह्यातील हा आकडा विक्रमी मानला जात आहे. विशेष म्हणजे लॉकडाउनच्या काळातसुद्धा रुग्णवाढ विशेष नियंत्रणात आलेली नाही.
हेही वाचा - कोरोना फक्त व्यापाऱ्यांमुळे होतो का? लॉकडाउनविरोधात...
जानेवारीमध्ये कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाल्याने रुग्णसंख्यासुद्धा कमी झालेली दिसून येत होती. पर्यायाने लग्नसमारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय मेळाव्यांना जणू उधाण आले होते.
त्यातच विनामास्क वावरणारे नागरिक, सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा, त्यातच आलेली ग्रामपंचायतीची निवडणूक यासर्व बाबींची कसर फेब्रुवारी महिन्याने पूर्ण केली. सुरुवातीपासूनच अचानक रुग्णवाढीला सुरुवात झाली, सोबतच मृत्यूही. कोरोना रुग्णसंख्या वाढताच प्रशासन खडबडून जागे झाले.
हेही वाचा - कोरोना काळातही बेजबाबदारीचा कळस, आरोग्य केंद्रात डॉक्टर अन् कर्मचाऱ्यांचीच दांडी
राज्यस्तरावर अमरावतीची दखल घेतल्या गेली आणि नंतर लॉकडाउनचा प्रयोग सुरू करण्यात आला. मात्र 22 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या लॉकडाउननंतर दररोज 650 ते 700 च्या घरात रुग्ण वाढत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी कालच पुन्हा एकदा आठ मार्चपर्यंत लॉकडाउन वाढविला आहे.
संपादन - अथर्व महांकाळ