esakal | सरपण आणायला जंगलात गेले वडील, अचानक ऐकू आली डरकाळी अन् सर्वच संपलं
sakal

बोलून बातमी शोधा

man killed in tiger attack in talodhi of chandrapur

नागभीड तालुक्‍यात तळोधी वनपरिक्षेत्र येते. या वनपरिक्षेत्रातील कोजबी येथील वासुदेव रामजी कोंडेकर हे सकाळी जंगलात सरपणासाठी गेले होते. सरपण गोळा करताना ते जंगलाच्या आत गेले.

सरपण आणायला जंगलात गेले वडील, अचानक ऐकू आली डरकाळी अन् सर्वच संपलं

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तळोधी (जि. चंद्रपूर) : सरपण आणण्यासाठी जंगलात गेलेल्या वृद्धावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना आज, सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. मृताचे नाव वासुदेव रामजी कोंडेकर (वय ५५) आहे. 

हेही वाचा - कोरोना काळातही बेजबाबदारीचा कळस, आरोग्य केंद्रात डॉक्टर अन् कर्मचाऱ्यांचीच दांडी

नागभीड तालुक्‍यात तळोधी वनपरिक्षेत्र येते. या वनपरिक्षेत्रातील कोजबी येथील वासुदेव रामजी कोंडेकर हे सकाळी जंगलात सरपणासाठी गेले होते. सरपण गोळा करताना ते जंगलाच्या आत गेले. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. बराचवेळ होऊनही ते घराकडे परतले नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरच्यांसह गावकऱ्यांनी जंगलात शोध घेतला. तेव्हा त्यांचा मृतदेह आढळून आला. घोडाझरी अभयारण्य घोषित झाल्यापासून गावात जंगली प्राण्यांचा वावर वाढला आहे. वाघ, बिबट गावाच्या परिसरात दिसू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

हेही वाचा - महसूल वाढविण्यासाठी सरकारचे मद्य विक्रीला प्रोत्साहन!; दोन दुकानातील अंतराची अट केली...

दरम्यान, हे गाव जंगलाला लागून असल्यामुळे या परिसरात वाघ, बिबट आणि इतर वन्य प्राण्यांचा वावर असतो. वाघ कधी घराच्या मागे लपून बसलेला असतो, तर कधी घराच्या बाहेर निघताच हल्ला करतो. त्यामुळे जगावं कसं? असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे.

loading image