CONFEDERATION OF ALL INDIA TRADERS
CONFEDERATION OF ALL INDIA TRADERSटिम ई सकाळ

वाईन विक्रीच्या परवानगीला अखिल भारतीय व्यापारी महासंघाचा विरोध

राज्यातील तरूणपिढीला व्यसनाधीन करण्याचा हा प्रयत्न - अखिल भारतीय व्यापारी महासंघ
Published on

राज्य सरकारने सुपरमार्केट (Super Market) आणि वॉक-इन स्टोअरमध्ये वाईन (Wine) विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलाय. मात्र या निर्णयावर भाजपसह अनेकांनी विरोध दर्शवलाय. यातच या निर्णयावर अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) विरोध केलाय. महासंघाच्या मुंबई महानगर युनिटमधील व्यापाऱ्यांनी वाईन विक्री करणार नसल्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील तरूणपिढीला व्यसनाधीन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सुध्दा अखिल भारतीय व्यापारी महासंघाने म्हटले आहे.

अखिल भारतीय व्यापारी महासंघा (कॅट) शी संबंधित किरकोळ दुकानदार वाईन विक्री करणार नाहीत. याशिवाय सुपर मार्केटनेही वाइन विक्री करू नये यासाठी आमचा प्रयत्न असेल, अशी भूमिका अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) घेतली आहे. राज्य सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी अखिल भारतीय व्यापारी महासंघ (कॅट)जोर धरुन आहे.

CONFEDERATION OF ALL INDIA TRADERS
हॉटेल व्यावसायिकांना दिलासा! गॅस सिलिंडर ९१ रुपयांनी स्वस्त

अखिल भारतीय व्यापारी महासंघ (कॅट) ही देशातील व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असून मुंबई महानगर क्षेत्रात ४ लाखांहून अधिक व्यापारी या संघटनेशी जोडलेले आहेत त्यामुळे अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) घेतलेली ही भुमिका राज्य सरकारवर किती आक्रमक ठरेल, हे आता बघणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com