महाविकास आघाडीत तणाव; 'या' दोन मुद्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीत एकमत नाही

टीम-ई-सकाळ
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

वायबी सेंटरवरील बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा अध्यक्ष आणि अजित पवारांच्या मुद्द्यांवरून दोन्ही पक्षांमध्ये एकमत होताना दिसत नाही.

मुंबई :  राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्री म्हणून (ता. 28) शिवाजी पार्कवर सायंकाळी 6.40 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असले तरी, महाविकास आघाडीत तणाव असल्याचे दिसत आहे. काही मुद्द्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एकमत होताना दिसत नाही.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

वायबी सेंटरवरील बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा अध्यक्ष आणि अजित पवारांच्या मुद्द्यांवरून दोन्ही पक्षांमध्ये एकमत होताना दिसत नाही. महाविकास आघाडीची पहिलीच बैठक फिस्कटली असल्याचे दिसत आहे. तब्बल चार तासानंतर ही बैठक संपली असली तरी अजित पवार हे माध्यमांना कुठलीही प्रतिक्रीया न देता निघून गेले आहेत. 

मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांकडे भाजपने सोपविली मोठी जबाबदारी

उद्या पुन्हा बैठक महाविकास आघाडीची बैठक होणार असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अजित पवार बैठकीतून बाहेर आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केलेलीही पाहायला मिळाली. उद्या शपथविधी होणार असतानाच शपथविधीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र विकास आघाडीच्या महत्वाच्या दोन पक्षात तणाव निर्माण झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला 'या' दिग्गज व्यक्तींची राहणार उपस्थिती 

दरम्यान, उद्या उद्धव ठाकरेंच्या होणाऱ्या शपथविधीला अनेक दिग्गज व्यक्ती या उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर राज्यभरातून एक लाख शिवसैनिक, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकारांना निमंत्रण देण्यात आले आहे. राज्यातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनादेखील सोहळ्यासाठी बोलावण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion create in Mahavikas Aghadi on two point