'मी पुन्हा येईन' म्हणणाऱ्या फडणवीसांकडे भाजपने सोपवली मोठी जबाबदारी

टीम ई-सकाळ
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

- राज्यात महाविकासआघाडीचे सरकार उद्या होणार स्थापन.

- या सरकारला घेरण्याची जबाबदारी सोपवली देवेंद्र फडणवीस यांच्याकडे.

मुंबई : भाजप आता विरोधी बाकावर बसणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीला भाजपकडून सहमती दर्शवण्यात आली आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार उद्या (गुरुवार) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देणार आहेत. त्यानंतर आता विधानसभेत महाविकासआघाडीला घेरण्यासाठी भाजपने तयारी सुरु केली आहे.

79 वर्षांच्या वस्तादाचे डाव पैलवानांना कळलेच नाही

त्यानुसारच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीदेखील त्यांच्या नावावर होकार दिल्याचे सांगितले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis elected as Opposition Leader of Maharashtra Legislative Assembly