Ashok Chavan: माझा ही मेटे करा, अशा चर्चा सुरू; अशोक चव्हाणांचा खळबळजनक दावा

अर्धापूर येथे एका कार्यक्रमात बोलतांना म्हणाले...
Ashok Chavan
Ashok Chavan esakal

Ashok Chavan: आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, तसंच घातपाताचा प्रयत्नही केला जात असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे.

तसंच आपल्या मंत्री पदाच्या लेटरहेडचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तींनी बदनामीकारक बनावट पत्रं तयार केल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

Ashok Chavan
Pankaja Munde: "अजित पवारांचा चांगला प्रचार सुरु"; कसब्यात प्रचाराला आलेल्या पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?

दरम्यान अर्धापूर येथे एका कार्यक्रमात बोलतांना म्हणाले, मला आज इथे यायला एक तास उशीर झाला, कारण मी पोलिस अधिक्षकांकडे तक्रार द्यायला गेलो होतो.

अज्ञात व्यक्ती कडून पाळत ठेवली जात असून मी कुठे जातो, कोणाला भेटतो, किती वाजता कुठे जातो या सर्व गोष्टीवर नजर ठेवली जात आहे तसेच याचा विनायक मेटे करा, अशा प्रकारच्या चर्चा केल्या जात असल्याचा दावा देखील त्यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्या काळातली काही शासकीय पत्रं मिळवून अज्ञात व्यक्तींनी त्यावरचा मूळ मजकूर मिटवला आणि सही तशीच ठेवून कोरं लेटरहेड तयार केलं.

काही दिवसांपूर्वीच चव्हाण यांना असं लेटरहेड सापडल्याने त्यांनी या आधीच पोलिसांत तक्रार दिली होती. तेव्हापासून याचा तपासही सुरू होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com