Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwaresakal

Sudhir Mungantiwar: "सुधीर मुनगंटीवारांनी PM मोदींच्या सभेत सर्व मर्यादा पार केल्या", काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार!

Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांचा काँग्रेसवर टीका केल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. काँग्रसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

Sudhir Mungantiwar :

मुंबई: राज्याचे वनमंत्री व भाजपचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेत सर्व मर्यादा पार केल्या, त्यांच्या आक्षेपार्ह विधानांमुळे आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन झाले आहे, असे सांगत त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ही तक्रार केली आहे. "सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना उद्देशून प्रक्षोभक भाषा आणि अपमानजनक टिप्पणी केली. समाजात द्वेष आणि मतभेद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. मुनगंटीवार यांनी महिलांबद्दलही अपमानजनक विधाने करून महिलांची बदनामी केली आहे," असे लोंढे म्हणाले.

"चुकीची माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. त्याची कृती केवळ आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन करणारी नसून लोकशाहीच्या नियमांची पायमल्ली करणारी आहे. त्यामळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी रद्द करावी. त्यांच्यावर आणि भाजपवर निवडणुका लढविण्यास बंदी घालावी," अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.

Sudhir Mungantiwar
IPL 2024 : काव्या मारनची मोठी खेळी! १.५ कोटी किंमत असलेल्या खेळाडूच्या जागी 22 वर्षीय स्पिनरची अचानक संघात एन्ट्री

यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, १९८४च्या शीख दंगलीदरम्यान झालेल्या अत्याचाराबद्दल मी बोललो. नरेंद्र मोदींच्या सभेमुळे काँग्रेसचा प्रचार वाहून जात आहे. त्यामुळे वेगळे नॅरेटिव्ह सेट करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

Sudhir Mungantiwar
DY Chandrachud: CJI चंद्रचूड खुर्ची सोडून स्टूलवर का बसले?; सरन्यायाधीशांच्या हालचालीने कोर्टरुममधील सर्वजण आश्चर्यचकित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com