बारा वर्षात काँग्रेसला जे कळलं नाही ते भाजपला कळलं - नितेश राणे

कार्यकर्त्यांचा पक्ष या भाजपच्या ओळखीवर शिक्कामोर्तब झालं
nitesh rane
nitesh rane

मुंबई : काँग्रेसला जे बारा वर्षात कळलं नाही ते भाजपला दीड वर्षात कळलं अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर दिली आहे. त्याचबरोबर सामान्य कार्यकर्त्यांची जाण असणारा पक्ष म्हणून जी भाजपची ओळख आहे त्यावर आज शिक्कामोर्तब झाल्याचंही नितेश राणे म्हणाले. (Congress did not know in twelve years which BJP knew says Nitesh Rane)

nitesh rane
Live: नारायण राणेंनी घेतली केंद्रीय मंत्रीपदाची शपथ

मंत्रिपदाच्या माध्यमातून राणे साहेब निश्चितपणे प्रमाणिक प्रयत्न करतील, मेहनत करतील. आज महाराष्ट्राच्या राजकारणाच्या अभ्यास आणि वरिष्ठतेचाही त्यांना फायदा मिळेल. त्यामध्येही राणेसाहेब पहिल्या दोन तीन क्रमांकावर आहेत. म्हणून याचा फायदा भारतीय जनता पार्टी संघटन म्हणून आम्हाला निश्चित पद्धतीनं होईल. कोकण असेल महाराष्ट्र असो जिथे जिथे आज भाजप वाढवण्याची गरज आहे तिथे आजचा दिवस आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी महत्वाचा दिवस आहे, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

nitesh rane
भारती पवार ठरल्या जिल्ह्यातील पहिल्या महिला केंद्रीय मंत्री

सहावर्षांनंतर नारायण राणे यांचं मंत्री म्हणून कमबॅक होतंय यावर बोलताना नितेश राणे म्हणाले, "मी याचं श्रेय भाजपच्या नेतृत्वाला देईन. जे काँग्रेसला बारा वर्षे समजलं नाही. ते भाजपच्या नेतृत्वाला कळलं की, राणेंची किंमत काय आहे. त्यांचं वजन काय आहे. त्यांचा अभ्यास आणि अनुभव काय आहे. काँग्रेसनं वारंवार राणेंना शब्द देऊनही तो पूर्ण केला नाही. पण अवघ्या दीड वर्षात भाजपनं मला आमदार केलं. माझ्या मोठ्या बंधुंना प्रदेश भाजपतं काम करण्याची संधी दिली. राणे साहेबांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिली. कार्यकर्त्याची जाण असणारा म्हणून भाजपची जी ओळख आहे. त्याच्यावर आज शिक्कामोर्तब झालं आहे. याचा फायदा भाजपसाठी कसा करता येईल याचा आम्ही प्रमाणिक प्रयत्न करणार आहोत."

राणे कुटुंबाला संपवण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील - निलेश राणे

निलेश राणे म्हणाले, "आम्हाला संपवणं अशक्य आहे. नारायण राणे यांना या जन्मात काय अनेक जन्मातही संपवता येणार नाही. त्यासाठी विरोधकांना अनेक जन्म घ्यावे लागतील. नारायण राणे मुख्यमंत्री होताना अचानक झाले होते. बाळासाहेब ठाकरेंनी याबाबत कसलीही पूर्व कल्पना दिली नव्हती. नारायण राणेंचा तेव्हाचा मुख्यमंत्रीपदाचा काळ आठवा ते जबाबदारी गांभीर्याने घेतात. त्यांनी आजवर प्रत्येक पदाला गांभीर्यानं घेतलं आहे. म्हणून आत्ताची केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी ते चोख बजावतील. याद्वारे देशाची सेवा करायची संधी त्यांना मिळाली आहे. माध्यमांना जे आमचे शत्रू वाटतात त्यांना आम्ही किंमतही देत नाही. नारायण राणेंचा नगरसेवक ते केंद्रीय मंत्री हा प्रवास सोपा नाही. हे येड्यागबाळ्याचं काम नाही."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com